शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बैठका व दौऱ्यांपुरताच मर्यादीत जि़पचा छापखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:53 IST

आनंद सुरवाडे जिल्हा परिषदेच्या स्टेशनरीचा खर्च वाचविण्यासह अन्य शासकीय कार्यालयातील स्टेशनरीची कामे घेऊन जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीत महत्त्वाची भूमिका ...

आनंद सुरवाडेजिल्हा परिषदेच्या स्टेशनरीचा खर्च वाचविण्यासह अन्य शासकीय कार्यालयातील स्टेशनरीची कामे घेऊन जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीत महत्त्वाची भूमिका असलेल्या जिल्हा परिषदेचा छापखाना सुरू होणार किंवा नाही याबाबत चा सस्पेंस अजुनही कायम आहे़ तरतूदी वाढविण्यास मंजुरी मिळाली असताना राजकीय प्रशासकीय ढकलाढकलीत हा छापखाना अडकल्याचे चित्र असून समिती केवळ दौऱ्यांपुरती व बैठकांपुरतीच मर्यादीत असल्याचे चित्र आजपर्यंत या छापखान्यासंदर्भातील कार्यवाहीनुसार समोर आले आहे़बंदावस्थेत असलेल्या छापखाना पुनरूज्जीवीत करण्यासाठी समिती अध्यक्ष जयपाल बोदडे व सदस्यांतर्फे हालचाली सुरू झाल्या होत्या़ समितीने सांगलीचा चार दिवसीय दौराही या वर्षीच्या फेबु्रवारी महिन्यात केला़ दौºयावर जाण्यापूर्वी छापखाना एप्रिल अखेरपर्यंत सुरू होईल, असा आशावाद घेऊन ही समिती दौºयावर गेली होती़ मात्र, तो आशावाद या ट्रिपमध्ये नाहीसा झाला, दौरा आटोपून आलेल्या समितीचे म्हणणे, त्यांचा अहवाल घेण्यास प्रशासकीय यंत्रणा वेळ देत नव्हती, अनेक दिवस हा विषय अंधातरीच राहिला, अखेर सर्वसाधरण सभेत यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली व छापखान्याचा विषय तरतूद करूनही बंद व्हावा, असे काहीसे चित्र निर्माण करण्यात आले कारण एकिकडे छापखान्याला कमीत कमी ७५ लाखांच्या तरतूदीची आवश्यकता असताना प्रशासनाने पाच लाखांची तरतूद करून त्यांची अनास्था उघड केल्याचा आरोपही झाला़ नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ५० लाखांच्या तरतूदीला मान्यता देण्यात आली़ मात्र, बैठकीला कोणी धजावत नव्हते, त्यात अध्यक्ष बोदडे व सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी पुढाकार घेऊन बैठक लावण्याची मागणी केली़ त्यानुसार बैठकही झाली, दौºयासह विविध विषय ठरले़ प्रशासकीय यंत्रणा राजकीय इच्छाशक्ती असेल तर हा छापखाना होईलच नाहीतर नाही, तर राजकीय मंडळी प्रशासनावर अनास्थेचा आरोप करत आहेत़ त्यातच नुकतेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांनी हा छापखाना सुरू झालाच तर आपण या जिल्हा परिषदेत पाऊल ठेवणार नाही, असे आव्हान देऊन नव्या प्रश्नांना तोंड फोडले आहे़ सध्या प्रत्येक विभागातील स्टेशनरी ही बाहेरून मागविली जाते, यात मोठी तरतूद व खर्च केला जातो, हा खर्च व त्यामागे भरणारी शाळा कदाचीत या छापखान्यातील मोठा अडसर असल्याचा आरोपही होत आहे़ छापखाना झाल्यास सेस फंडात मोठी वाढ होणार आहे़ असे असताना नक्की कोणती इच्छाशक्ती कमी पडतेय, माजी अध्यक्षांनी असे आव्हान का दिले असेल, त्यांना नेमके कोणते अनुभव आले, यामुळे छापखान्याची वाट अधिकच बिकट केली आहे़ अध्यक्ष बोदडे हा विषय मार्गी लावू शकता का, हा प्रश्न आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव