शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील खडका येथे वीज उपकेंद्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:08 IST

भुसावळ तालुक्यातील खडका येथील ४०० के.व्ही. सबस्टेशनमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा दाब नियंत्रित करणाऱ्या रिॅअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली.

ठळक मुद्देविजेचा दाब नियंत्रित करणाºया रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने लागली आगभुसावळ, फैजपूर, दीपनगर येथील अग्निशमन बंबांनी आग आणली नियंत्रणातघटनेनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील खडका येथील ४०० के.व्ही. सबस्टेशनमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा दाब नियंत्रित करणाऱ्या रिॅअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. अग्नीशमन दलाच्या चार-पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीमुळे अकोला, कोराडी, औरंगाबाद येथील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरावर काम करीत होते.दरम्यान, आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्यापही समजू शकत नसल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक नेहते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, तर अकोला, कोराडी, औरंगाबाद येथील काही भागातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.खडका येथील ४०० केव्ही सबस्टेशनमध्ये दुपारी १२ वाजता नवीन ट्रान्सफार्मरची विधिवत पूजा करण्यात येवून कार्यान्वित करण्यात आला. मात्र अवघ्या एक तासातच या ट्रान्सफार्मच्या आॅईल गळतीमुळे त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की, यामुळे संपूर्ण गावाला हादरा बसला व आकाशात धुराचे लोट दिसत होते. या ट्रान्सफार्मरचे एक-दिड वर्षापासून दुरुस्तीचे कामकाज सुरू होते. टेस्टींगनंतर तो कार्यान्वित करण्यात आला होता. झालेल्या भयानक स्फोटामुळे सबस्टेशनच्या यार्ड परिसरातील लाखो रुपयांची केबल व गवताने पेट घेतला. यामुळे आगीने रुद्र रुप धारण केले होते. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा समोर आला नसला तरी अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीवर दीपनगर, भुसावळ नपा, फैजपूर पालिकेच्या सात बंबांनी आगीवर तब्बल चार ते पाच तासांनी नियंत्रण मिळविले.सबस्टेशनमधील विजेचा दाब नियंत्रित करणाºया रिअ‍ॅक्टरला प्रथम आग लागली असावी, यातून ही आग पुढे वाढली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :fireआगBhusawalभुसावळ