शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अखंड लागलीसे ज्योती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:15 IST

अविवेक सटकला की विवेक प्रकाशमान झालाच समजा

मी अविवेकाची काजळी । फेडुनि विवेक दीप उजळी ।तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज भगवतांच्या अवताराच्या प्रयोजनापर श्लोकावर निरुपण करत आहेत. ‘संभवामि युगे युगे’ हा तो सुप्रसिद्ध श्लोक. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय? तर विवेकरुपी दिव्यावर अविवेकाची काजळी चढते. ती काजळी म्हणजे हा विवेकदीप पूर्ववत प्रज्वलीत होतो. तो विझलेला नसतोच पण अविवेकाच्या काजळीने नुसता मिणमिणत असतो. फक्त अविवेक सटकला की विवेक प्रकाशमान झालाच समजा. मग योग्यांच्या हृदयात प्रस्फुरित झालेला हा ज्ञानप्रकाश म्हणजे त्यांची दिवाळीच म्हणावी. लौकीक दिवाळीचे प्रकाशपर्व वर्षातून चार-सहा दिवसांपुरतेच येते. पण योग्यांची ही दिवाळी म्हणजे निरंतर ज्ञानाच्या प्रकाशाचा अविरत उत्सव.न कळे दिवसराती । अखंड लागलीसे ज्योती ।। असा या निरंतर दिवाळीचा अनुभव संत तुकाराम महाराजांना आला. ज्ञानाची ही दिवाळी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी संत महात्मे अविरत जागे असतात. ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव हे प्रकाशाची । तैम्ही वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ।। असे माऊली सांगत आहेत. आपल्या दारी लावलेले दिवाळीचे दिवे बाहेरचा अंधार दूर करतील. पण अंतकरणातल्या अंधाराचे काय? तिथे कोणता दिवा लावणार? विवेक जागा करणं हाच एक उपाय आहे. त्यावर त्यासाठीच संत महात्माचा अवतार आहे. अज्ञान अंहकार दूर करण्याची माझी क्षमता नाही- त्यासाठी मला संतांना शरण गेलं पाहिजे.आज आपण पाहतो क्षणभराचा अविवेक अनेकांचे संसार उद्धवस्त करतो. भावनावेशात विवेक हरपतो. बाहेर आनंदाचा देखावा सुरू आहे. सुखाच्या साधनांची, वस्तुंची रेलचेल आहे. वस्तू ठेवायला घरात जागा नाही. पण घरात राहणाऱ्या माणसांच्या मनीचा संकोच झालेला एकमेकांशी संवाद नाही. परस्परावर विश्वास नाही. सर्वांनीच मुखवटे धारण केलेले, खरा चेहरा कुणालाच दिसत नाही. अशा भवतालात आपण राहतो आहोत. संताच्या या शिकवणुकीनुसार आपण हा विवेकदीप उजळला तरच खºया अर्थाने ज्ञानाची दिवाळी आपल्याला साजरी करता येईल.-प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव