जिजाबराव वाघ
चाळीसगावः ' आई सीतामाई अग्रवाल अतिशय सोशिक आणि शिस्तप्रिय होती. घरातील या संस्कारांना पैलू पाडले ते शिक्षकांनी. ८४ वर्षाच्या आयुष्यात मी जो काही घडलो. तो गुरुजनांमुळेच. समर्पित भावनेने काम करणा-या शिक्षकांमुळे जीवनाला आकार मिळाला. पुढे गेली ५५ वर्ष चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या गोतावळ्यात शिक्षकच सगे - सोयरे झाले. शिक्षकांविषयी आठवणींचा जागर करताना नारायणदास अग्रवाल असे भावुक झाले होते.
नारायणदास अग्रवाल हे गेल्या ५५ वर्षापासून चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीत पदाधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मॕॅनेजिंग बोर्ड चेअरमनपद आणि संस्थेचा सुकाणूच त्यांच्या खांद्यावर आहे. या वयात कोरोना महामारीतही दरदिवशी पाच किमी चालणे, घरात सायकलिंग करण्यासह गुरुचरित्राची पारायणे करणे. अशी दिवसभराची त्यांची दिनचर्या आहे. कुस्ती व कॕॅरमपटू म्हणून त्यांनी एक काळ गाजवला. शिक्षकांविषयी त्यांना विशेष आस्था आहे. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्तीने त्यांना काम करायला आवडते. कुस्तीविषयी त्यांना लळा आहे.
शिक्षकांनी दिलेली दिशा दीपस्तंभासारखी एसएससी उत्तीर्ण झाल्यानंतर नारायणदास अग्रवाल यांना मुंबईच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा काहींनी सल्ला दिला. मात्र आ.बं.हायस्कूलचे शिक्षक भा.य.देशपांडे यांनी त्यांना रुईया महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगितले. या महाविद्यालयात अग्रवाल यांचे व्यक्तिमत्व अधिक झळाळून निघाले. गुरुंनी दाखवलेली दिशा त्यांच्यासाठी दीपस्तंभच ठरली. .....
चौकट
नारायणदास अग्रवाल यांनी अमळनेरला प्रताप महाविद्यालयात बीएस्सला प्रवेश घेतला. येथे शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्यातील संघटन कौशल्य बहरले. विविध खेळ खेळण्याकडे त्यांचा कल वाढला. त्यांनी महाविद्यालयात निवडणुकीसाठी पूर्ण पॕॅनल निवडून आले. ते स्वतः जीएसही झाले. याकाळात प्राचार्य लाड व दामले यांनी त्यांची पाठराखण केली. क्रीडा विभागप्रमुख नेने यांनी त्यांच्या पंखांमध्ये नेहमीच बळ भरले. 'शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष दिले तर काय चत्मकार घडू शकतो. हे माझ्या बाबतीत म्हणता येईल.