शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथील एकावर कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत असताना वाचविण्यासाठी आलेल्याचाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथील एकावर कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत असताना वाचविण्यासाठी आलेल्याचाच खून केला. या गुन्ह्यातील आरोपीस येथील जिल्हा सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी सुनावली.वडगाव बुद्रूक येथे १७ आॅगस्ट २०१८ रोजी दशरथ हसरत भिल हा दुपारी घरी जेवण करीत असताना मंगल धनसिंग गायकवाड तेथे आला. त्याने दशरथ भिल याच्या पत्नीचा हात धरला. दशरथचे लक्ष गेल्यावर त्याने हात सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगल याने दशरथचा गळा दाबून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दशरथने स्वत:ची सुटका करत पळ काढला. मात्र आरोपी मंगल याने घरातून कुºहाड आणून दशरथचा पाठलाग केला.दशरथ गावातील एका मंदिरामागे लपला होता. तेव्हा मंदिरावर बसलेल्या रामदास हसरत भिल यांनी त्यास विचारले की, तू कोणाच्या मागे पळत आहेस, याचा राग आल्याने मंगलने त्याच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रामदासचे सासरे गणेश सुका भिल हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता मंगलने त्यांनाही झोपडीत ढकलून दिले. तसेच तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून मानेवर, डोक्यावर कुºहाडीने वार केले. त्यामुळे गणेश भिल जागीच ठार झाले. नंतर ग्रामस्थांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दशरथ भिल याच्या फिर्यादीवरून आरोपी मंगल विरुद्ध खून व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.दरम्यान, सरकारी वकील किशोर बागुल यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. मात्र न्या. राजीव पांडे यांनी मीना भिल, रामदास भिल, गणेशची पत्नी मालू भिल व रुग्णालयाचे डॉ.विष्णू दायमा यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी मंगल यास विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व ३ हजार रुपये दंड, तो न भरल्यास १ वर्ष शिक्षा, कलम ३०७ नुसार ५ वर्षे शिक्षा, २ हजार रुपये दंड व तो न भरल्यास ६ महिने शिक्षा, तसेच कलम ३५४ प्रमाणे दीड वर्षे शिक्षा व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून भामरे तर केसवॉच म्हणून महेश रामराव पाटील यांनी काम पाहिले.