शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:44 IST

अमळनेर (जि.जळगाव) : मेलाणे (ता.चोपडा) येथील पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडग्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायधिश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.मेलाणे (ता.चोपडा) येथे ३ मार्च २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान दारूच्या सवयीमुळे भावसिंग डोंगरसिंग पावरा (४०) याने पत्नीशी भांडण करून लाकडी दांडग्याने राहत्या घरी ...

ठळक मुद्देदारूच्या सवयीमुळे पत्नीशी भांडणलाकडी दांडग्याने केली होती मारहाणखटल्यात तपासले ११ साक्षीदार

अमळनेर (जि.जळगाव) : मेलाणे (ता.चोपडा) येथील पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडग्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायधिश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.मेलाणे (ता.चोपडा) येथे ३ मार्च २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान दारूच्या सवयीमुळे भावसिंग डोंगरसिंग पावरा (४०) याने पत्नीशी भांडण करून लाकडी दांडग्याने राहत्या घरी मारहाण करून तीन लहान मुलांना सोडून पळून गेला होता.याबाबत ज्योतीबाई हिच्यावर १६ वार झाल्याने ती जागीच गतप्राण झाली होती. याबाबत मेलाणे येथील पोलीस पाटील शिवाजी पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी आरोपीस अटक करून कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला जिल्हा कारागृहात तपासाचा निकाल लागेपर्यंत ठेवण्याचे आदेश दिले होते.या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात गावातील पोलीस पाटील शिवाजी पावरा, जप्ती पंच तसेच डॉ.एस.सी.पाथरवड यांची साक्ष महत्त्वाची ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधिश राजीव पांडे यांनी आरोपीस जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली हा खटला सरकारी वकील किशोर बागुल यांनी चालवला. 

टॅग्स :Crimeगुन्हाAmalnerअमळनेर