शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जळगाव येथे आयोजित लेवा पाटीदार समाज महामेळाव्याला समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 15:29 IST

मुलींचे घटते प्रमाण, वाढते घटस्फोट समाजासाठी चिंताजनक -एकनाथराव खडसे

ठळक मुद्दे‘२६/११’मुळे सत्काराला फाटा समाजबांधवांची प्रचंड गर्दीसामुहीक विवाह सुरू करण्याचे आवाहन

जळगाव : लेवा नवयुवक संघातर्फे २६ रोजी शिवतीर्थ मैदानावर आयोजित लेवा पाटीदार समाजाच्या विश्वस्तरीय वधू-वर परिचय महामेळाव्यास समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करताना मेळाव्याचे उद्घाटक माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी समाजातील मुलींची घटती संख्या तसेच घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याचे सांगत समाजाने बदल स्विकारून यात सुधारणा करण्याचे आवाहन केले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार सुरेश भोळे, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके, डॉ.ए.जी. भंगाळे, सुनील बढे,  नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश पाटील म्हणाले की लेवापाटीदार समाजाने शिक्षण, उद्योग क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. अगदी चंद्रापर्यंत पोहोचण्याइतकी प्रगती केली आहे. मात्र त्याचबरोबर सामाजिक विषयात मात्र अधोगती सुरू आहे. फक्त मुलगीच अपत्य असेल तर अशा घरातील मुलगी सून म्हणून चालत नाही, असे प्रकार निदर्शनास येतात. सामाजिक परिस्थितीत बदल झाला आहे. समाज सुशिक्षीत झाला आहे. त्यामुळे विचारही सुशिक्षीत, पुढारलेले व्हायला हवेत. लेवा समाजातील पोटजातीतील भेद १९५६ ला नष्ट केले. त्यानंतर पुन्हा १९६५-६६ ला हे मतभेद मिटविले. १९८४ ला पुन्हा सर्व पोटजातींना एकत्र आणले. आता फेब्रुवारीत होणाºया कार्यक्रमात सर्वांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न असेल.लेवा नवयुवक संघाच्या कार्याचा गौरवमाजी मंत्री खडसे म्हणाले की, लेवा नवयुवक संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे हे ३१वे वर्ष आहे. समाजातील उपवर युवक-युवतींची माहिती गोळा करणे, त्याची सूची करणे, मेळाव्यांचे आयोजन करणे हे वर्षभर चालणारे काम लेवा नवयुवक संघाने अतिशय कौतुकास्पदरित्या सुरू ठेवले आहे.‘२६/११’मुळे सत्काराला फाटा२६ नोव्हेंबर रोजीच मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी देशासाठी शहीद झाले होते. त्या शहीदांना या वधू-वर परिचय महामेळाव्याच्या प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यामुळे सत्कार कार्यक्रमांनाही फाटा देण्यात आला. आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे केवळ शब्दसुमनांनी स्वागत केले.समाजबांधवांची प्रचंड गर्दीमेळाव्यासाठी ३२०० मुले व २२०० मुलींची नोंदणी झालेली होती. त्यामुळे त्यांच्या सोबत आई-वडील, भाऊ किंवा बहिण असे तीन-चार जणही आलेले होते. त्यामुळे किमान ८ ते १० हजार समाजबांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे शिवतीर्थ मैदान परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र आयोजकांनी चोख व्यवस्था केलेली असल्याने तसेच समाजबांधवही शिस्तीचे पालन करीत सूचना मिळेल, त्यानुसार वाहने लावत रांग लावून मंडपात प्रवेश करीत असल्याने कार्यक्रम अत्यंत शांतपणे पार पडला.मुलींचे घटते प्रमाण, घटस्फोटांचे वाढते प्रमाण घातकखडसे म्हणाले की, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जगभरात विस्तारलेल्या, प्रगतीकडे वाटचाल करणाºया लेवा समाज संवादात कमी पडतोय का? असे वाटते. परिचय पुस्तिकेतील मुला-मुलींची संख्या पाहिली तर दिसते की, ३२०० मुलांची तर २२०० मुलींची नोंद आहे. म्हणजे मुले व मुलींमध्ये १००० ची तफावत आहे. नुकताच पुण्यातील मेळाव्यालाही गेलो होतो. तेथेही असेच चित्र बघायला मिळाले. हे व्यस्त प्रमाण समाजास घातक ठरू शकते. तसेच मुली देखील मुलांच्या बरोबरीने कमावत्या झाल्या आहेत. मात्र त्यामुळे मुला-मुलींमधील ‘ईगो’ही वाढले आहेत. त्याचा परिणाम घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. अगदी लग्न होऊन महिना, सहा महिनेच झालेल्यांचे देखील घटस्फोटासाठीची प्रकरणे भोरगाव लेवा पंचायतकडे, माझ्याकडे येतात. लग्न आनंदाचा क्षण आहे. लग्न वेळेतच लागले पाहिजे. वेळेवर लग्न लावायचेच नसेल तर मुहूर्त काढायचाच कशाला? अशी विचारणाही त्यांनी केली.सामुहीक विवाह सुरू कराआमदार खडसे म्हणाले की, लेवा समाजात सामूहिक विवाह होताना दिसत नाहीत. प्रत्येकजण लग्नात बडेजाव करताना दिसतो. मात्र तोच पैसा समाजाच्या कामासाठी उपयोगात येऊ शकतो. त्यामुळे यापुढे सामूहिक विवाह व्हावेत, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.आवारात सूची, प्रवेश पास साठी स्टॉलशिवतीर्थ मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर एक स्टॉल लावून समाजबांधवांना मार्गदर्शन केले जात होते. या वधू-वर परिचय मेळाव्याला शिस्त असावी, अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी प्रवेशासाठी पास सक्तीचा करण्यात आलेला होता. त्यासाठी शिवतीर्थ मैदानावरच मुख्य मंडपाबाहेर पास साठी स्टॉल लावण्यात आलेला होता. तेथे पास घेण्यासाठी समाजबांधवांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच वधू-वर परिचय सूचीसाठी वेगळा स्टॉल होता. पास घेतल्यावर समाजबांधव परिचय सूची घेत होेते. तसेच वधू किंवा वराला मेळाव्यात बसल्यावर पसंत पडलेल्या स्थळाची नोंदणी करता यासाठी काही व्यावसायिकांनी स्टॉल लावून फॉर्म उपलब्ध करून दिलेले होते.