शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सांगा पाहू..कोंबडा की कोंबडी

By admin | Updated: June 24, 2017 12:58 IST

भोरटेक येथील या पक्ष्याला तुरा नाही पण मागे आहेत झुपकेदार पिसे

 प्रमोद ललवाणी/ऑनलाईन लोकमत विशेष

कजगाव ता. भडगाव,दि.24 - मनुष्य प्राण्यामध्ये  पुरुषही नाही आणि बाईही नाही, अशी व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी  ब:याचदा पाहण्यास मिळते. मात्र पशू- पक्षांमध्ये  काहीसा असा प्रकार असू शकतो यावर मात्र कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र कोंबडा की कोंबडी ? असा प्रश्न पाहणा:याला पडावा  असा एक कोंबडा (?) जवळच असलेल्या भोरटेक परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
भोरटेक येथील शेतकरी अरुण दोधा पाटील यांना विविध प्राणी- पक्षी पाळण्याचा छंद आहे. त्यांनी आपल्या शेतात गाय, म्हैस, बकरी बैल यांच्यासोबतच कोंबडय़ा, कबुतर, कुत्रे, बगळे आदी प्राणी -पक्षीही पाळले  आहेत. या प्रत्येकाची ते घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. कजगाव- चाळीसगाव मार्गावर  पाटील यांच्या शेतीत मोठया झाडा खाली हे सर्व प्राणी - पक्षी मोकळया मोठया आनंदात वावरताना दिसतात. अरुण दोधा पाटील यांची बागाईत जमीन आहे.   
अरुण पाटील हे दिडवर्षापूर्वी कामा निम्मित भडगाव येथे गेले असतांना रस्त्यावर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले. या ठिकाणी त्यांना एक आगळा वेगळा कोंबडा नजरेस पडला. आणि तो त्यांनी हॉटेल मालकाकडून विकत घेतला. पाहता पाहता या आगळ्या वेगळ्या कोंबडय़ाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. त्याला पाहण्यासाठी परिचित लोक येवू लागले.       
सध्या जवळपास 3 वर्ष वय असलेल्या या पक्षाला समोरून पाहिले तर कोंबडी व बाजूने पाहिले तर कोंबडा वाटतो. डोक्यावर तुरा नाही तर मागच्या भागावर कोंबडय़ासारखे झुपकेदार पिसे आहेत. त्यामुळे पाहणा:यास हा कोंबडा की कोंबडी  असा प्रश्न नक्की पडतो. 
 
अरुण पाटील यांच्याकडे असलेला कोंबडा क्वचितच आढळतो. हा पक्षी अंडेही देत नाही आणि त्याची प्रजनन क्षमताही नाही. 
-डॉ. स्वप्नील प्रल्हाद पाटील, पशूवैद्यकीय 
 
आतार्पयत आपण अनेक पक्षी पाहिले. मात्र असा पक्षी लाखात एखादाच आढळून आला. थोडा मोठा झाल्यावर फरक लगेच जाणवतो. अन्यथा लवकर लक्षातही  येत नाही. 
- डॉ. रवींद्र पाटील, 
यशवंत अॅग्रीटेक, पाळधी