शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तारीख कळवा आम्ही तुमचे काय-काय फोडू ते पहाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजपचे आमदार तथा व्यापारी असलेल्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाजपचे आमदार तथा व्यापारी असलेल्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. लाड यांच्यासारख्या व्यापारी माणसाला अशी भाषा करणे योग्य नाही. मात्र, जर त्यांनी तसा इशाराच दिला असेल तर लाड यांनी आम्हाला तशी तारीख कळवावी, त्यांनी तर सेना भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी, आम्ही त्यांचे काय-काय फोडू हे त्यांना लक्षात आणून देऊ, असे थेट आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली होती. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी रात्री अजिंठा विश्रामगृह येते प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने आता काहीही करून वातावरण विस्कळीत करण्याचा हा प्रकार आता भाजपकडून सुरू आहे. मागेही काही कारण नसताना भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेना भवनावर चालून आले होते.

गिरीश महाजनांनी जामनेरकडे पहावे

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोकणातील पूरग्रस्तांच्या मुद्यावरून राजकारण करू नये, ही वेळ राजकारण करण्याची नसून, पूरग्रस्तांची मदत करण्याची वेळ आहे. महाजन जामनेरमधून थेट कोकणात मदतीला जात आहे. त्यांचे अभिनंदन. मात्र, जामनेरमध्ये काय सुरू आहे? याकडेदेखील महाजनांनी लक्ष दिले पाहिजे. पंचनामे बाकी आहेत ते पूर्ण झाल्यानंतरच मदत करता येणार आहे. शासनाने सद्या:स्थ‌िती दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, यावर देखील शासन पुढे काम करत राहणार आहे.