शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना हसत खेळत मिळताय विज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:42 IST

नाविण्यपूर्ण उपक्रम: 500 वर कार्यशाळांमधून मोफत मार्गदर्शन

ठळक मुद्देहसत - खेळत ज्ञान उपलब्ध करुन दिले जातेनवनिर्मितीचे बिजे पेरण्याचे काम
जळगाव- सतत प्रश्न विचारणारी घरातील लहान मुले हे पृथ्वीवरचे पहिले शास्त्र असल्याचे देशाचे महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम नेहमीच म्हणत. लहान मुलांमधील या जि™ोसेला योग्य वाट दाखवली तर त्या मुलाचा विकास हा निश्चितच उज्वल होवू शकतो. हे हेरुन शहरातील कुतूहल फाऊंडेशने सायन्स कार्यशाळा आणि संडे सायन्स स्कूल असा नाविण्यपूर्ण उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सुरु ठेवला आहे. ज्युनीअर केजी ते 10 वी र्पयतच्या मुलांमधील शास्त्रज्ञ विकसित व्हावा. विज्ञानाबद्दल त्यांच्यात आत्मश्विास निर्माण व्हावा यासाठी कुतूहल फाऊंडेशनचे संचालक महेश गोराडे या तरुणाने हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. संडे सायन्स स्कूल दर रविवावरी दोन तास शहरातील रिंगरोड भागात घेतली जाते. या वयोगटानुसार मुलांना किटस् देऊन त्यांच्या हातूनच विविध मॉडेल्स बनवून घेतले जातात तसेच त्यामागील संकल्पना समजवली जाते. यामुळे विज्ञानाची भिती कमी होवून विषय सोपा होतो. भौतिक,ल रसायन, जीवशास्त्रासह रोबोटीक्स, जादूचा कारंजा, हायड्रोलीक बोट, फिल्म प्रोजेक्टर असे हजारो प्रयोग मुलांना करायला मिळतात.अशी घेतली जाते कार्यशाळासंस्थेतर्फे विविध ठिकाणी मुले तसेच पालकांसाठी देखील मोफत कार्यशाळा घेतल्या जातात. आतार्पयत 500 च्या वर अशा कार्यशाळा शहर, ग्रामीण तसेच मागासलेल्या भागात झाल्या आहेत. यात मुलांना वैज्ञानिक खेळणी दिली जाते. विविध मॉडेल्सच्या संकल्पना सांगून ते बनवून घेतले जाते. टाकऊतून टिकाऊ वस्तूच्या मार्गदर्शनासह मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन तयार केला जातो. तर पालकांना अगदी आजी- आजोबा र्पयत वैज्ञानिक खेळ देवून त्यांनाही विज्ञानाबद्दल सहज व सोप्या पद्धतीने हसत - खेळत ज्ञान उपलब्ध करुन दिले जाते.ब्रेक अॅण्ड मेकलहान मुले ब:याचदा खेळणी मोडून टाकतात. तेव्हा पालक त्यांना रागवतात. मात्र ती खेळणी कशी चालते हे पाहण्याच्या कुतूहलातून ते मुल ती खेळणी तोडून टाकते. हे लक्षात घेता त्याची जिज्ञासा ब्रेक न करता त्याला व्यवस्थित माहिती द्यावी असेही प्रबोधन पालकांचे केले जाते. याचबरोबर पालकांच्या कार्यशाळेत त्यांना विविध वस्तू उलगडून पुन्हा त्या जोडण्यास सांगितले जाते. यामागे पालकांनाही घरातील प्रत्येक गोष्टींच प्राथमिक ज्ञान मिळावे हा उद्देश गोराडे यांचा आहे. याचबरोबर टिव्ही आणि मोबाईलचा अति वापर टाळून त्याचा योग्य वापरच करावा, याबाबतही प्रबोधनाचे काम गोराडे यांनी हाती घेतले आहे. मुलांमध्ये विज्ञान व नवनिर्मितीचे बिजे पेरण्याचे काम हसत-खेळत करण्याची कमालही त्यांनी साधली आहे.