शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेच्या बैठकीकडे जळगावात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:25 IST

मनपा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना व इच्छुक उमेदवारांना माहिती मिळावी यासाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी बोलाविलेल्या बैठकीकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी पाठ फिरविली.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलविली बैठकउमेदवारांना दररोज द्यावी लागेल निवडणूक खर्चाची माहितीउमेदवारांमध्ये दिसून आली अनास्था

जळगाव - मनपा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना व इच्छुक उमेदवारांना माहिती मिळावी यासाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी बोलाविलेल्या बैठकीकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी पाठ फिरविली.आचारसंहितेबाबतची माहिती जाणून घेण्याबाबत राजकीय पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांमध्ये अनास्था दिसून आली. या बैठकीस माजी महापौर रमेशदादा जैन हे सुरुवातीपासून उपस्थित होते. तर बैठक संपण्याच्याकाही मिनीटांपूर्वी भाजपाचे गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी हजेरी लावली. यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हता. मनपाच्यादुसºया मजल्यावरील सभागृहात झालेल्या बैठकीला मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, आस्थापना अधीक्षक सुभाष मराठे हे उपस्थित होते.निवडणूक खर्चासाठी उघडावे लागेल स्वतंत्र खातेमनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी बॅँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार असून, त्यामध्ये निवडणूक आयोगाने खर्च करण्यासाठी निश्चित केलेली रक्कम किंवा त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच उमेदवारांनी निवडणूक प्रचार किंवा इतर कामांसाठी खर्च केलेल्या रक्कमेची माहिती दररोज निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डांगे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना शुक्रवारी मनपात झालेल्या बैठकीत दिल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव