शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील शिरसोली व रामदेववाडी शिवारात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 15:24 IST

तालुक्यातील रामदेववाडी रस्त्यावरील नेव्हरे मारोती मंदिर शिवारात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बाबुलाल दलपत पाटील यांच्या मालकीच्या म्हशीच्या पिल्लाचा १९ रोजी या बिबट्याने फडशा पाडला आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने पाच जणांचा बळी घेतल्याची भीती आजही कायम आहे. त्यामुळे शिरसोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  म्हशीच्या पिल्लाचा पाडला फडशावन विभागाने केला पंचनामा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : तालुक्यातील रामदेववाडी रस्त्यावरील नेव्हरे मारोती मंदिर शिवारात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बाबुलाल दलपत पाटील यांच्या मालकीच्या म्हशीच्या पिल्लाचा १९ रोजी या बिबट्याने फडशा पाडला आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने पाच जणांचा बळी घेतल्याची भीती आजही कायम आहे. त्यामुळे शिरसोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, शिरसोली परिसरात बिबट्याने म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याचे समजल्यानंतर पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने वनाधिकारी एन.जी.पाटील यांना कळविली. त्यांनी वनपाल पी.जे.सोनवणे, वनरक्षक पी.एस.भारुडे व डी.ए.जाधव यांनी घटनास्थळ गाठून मृत झालेल्या म्हशीच्या पिल्लाचा पंचनामा केला. गेल्या महिन्यात सामनेर व दहिगाव परिसरातही बिबट्या दिसल्याची चर्चा होती. आता शिरसोली शिवारात चर्चा सुरु झाली आहे. रामदेववाडी, वराड, विटनेर व उमाळा या गावांना जोडणारे हे एक जंगल असून या परिसरात नीलगाय, हरीण यासारख्या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.