शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव लांबे शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 14:40 IST

चाळीसगाव शहरापासून ८ ते १० किमी अंतरावरील वडगाव लांबे शिवारात ऊसतोड मजुरांना बिबट्याची दोन पिल्लू आढळून आले.

ठळक मुद्देदोन दिवसानंतर आई आणि पिलाची झाली भेट दृश्य वनविभागाच्या ट्रॕप कॕमेऱ्यात कैद

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शहरापासून ८ ते १० किमी अंतरावरील वडगाव लांबे शिवारात ऊसतोड मजुरांना बिबट्याची दोन पिल्लू आढळून आले. मात्र काही तासांच्या अवधीनंतर एक पिल्लू मादी उचलून घेऊन गेली असावी, असा अंदाज आहे. दुसऱ्या पिलासही तिनेच दोन दिवसानंतर नेल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॕप कॕमेऱ्यात मंगळवारी कैद झाले आहे, अशी माहिती चाळीसगाववनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

वडगाव लांबे शिवारात प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असताना ऊसतोड मजुरांना सात रोजी बिबट्याचे दोन पिल्लू दिसून आले. वनविभागास याची खबर लागताच शितल नगराळे यांनी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विवेक देसाई यांच्यासह परिसराची पाहणी केली असता एकच पिल्लू आढळून आले. एक पिल्लू मादी घेऊन गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

वनपाल जी. एस. पिंजारी, वनरक्षक एम. बी. चव्हाण, एस. एच. जाधव, वाय. के. देशमुख, आर. आर. पाटील, वनमजूर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, भटू अहिरे, संजय गायकवाड, राहुल मांडोळे यांनी यासाठी सहकार्य केले.

दुसरे पिल्लू नेल्याचे कॕमेऱ्यात कैद

आढळलेले पिल्लू सुरक्षितरित्या एका कॕरेटमध्ये ठेऊन दोन ठिकाणी वनविभागाने ट्रॕप कॕमेरे लावले. यावेळी कॕमेऱ्यात मादी पिल्लू असलेल्या कॕरेटच्या अवतीभोवती फिरत असल्याचे कैद झाले.

दुसऱ्या दिवशी हा परिसर निर्मनुष्य केला असता मंगळवारी सकाळी ट्रॕप कॕमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात मादी असलेली आई आपल्या पिलास घेऊन जात असल्याचा प्रसंग कैद झाला आहे.

प्रसंगावधानता ठेऊन आम्ही परिसरात दोन ठिकाणी ट्रॕप कॕमेरे लावले. परिसर निर्मनुष्य केला. यामुळे दोन दिवसानंतर मादी असलेली व पिलाची भेट झाली. पिल्लू मादीच घेऊन जात असल्याचे दृष्य मंगळवारी कॕमेऱ्यात कैद झाले आहे.

- शितल नगराळे,

वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव वनविभाग.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावTigerवाघforest departmentवनविभाग