शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

घोसला येथील गुराख्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:05 IST

रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देकोयत्यामुळे झाला बिबट्याच्या हल्ल्यातून बचावघोसला येथील गुराख्यावर केला दोनवेळा हल्लाजळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव : रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.घोसला येथील रहिवासी असलेले सांडू तडवी गुरे चारण्याचे काम करतात. शुक्रवारी नेहमी प्रमाणे ते रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. त्या वेळी गुरे चरत असताना ते एका ठिकाणी बसलेले होते. त्या वेळी दाट झाडीतून बिबट्या आला व त्याने थेट पंजाने तडवी यांच्या कपाळावर हल्ला केला. त्या वेळी तडवी यांनी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली. काही वेळात पुन्हा हा बिबट्या पलटून आला व त्याने तडवी यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी बिबट्यापासून डाव्या हाताने चेहरा वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र बिबट्याने तडवी यांच्या हातावरही पंजाने वार केला. त्यात तडवी यांच्या कपाळासह हातालाही दुखापत झाली. बिबट्या अत्यंत चवताळेला असल्याने तो सोडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वत:जवळ असलेला कोयता काढला व बिबट्याच्या दिशेने तो चालविला. त्या वेळी बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली.

टॅग्स :leopardबिबट्याJalgaonजळगाव