शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव परिसरात बिबटय़ाची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 12:36 IST

वनविभागाला हुलकावणी : गुरांचा फडशा, माणसांचे घेतले बळी

ठळक मुद्देजनावरांचा फडशादोघा शेतमजुरांचे बळी  वनविभागाचे अपयश 

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 23 - पिलखोड परिसरात नरभक्षक बिबटय़ाने आपला ‘डेरा’ चांगलाच वाढवला असून दरदिवशी तो वनविभागाला हुलकावणी देत आपली शिकार फत्ते करीत आहे. बुधवारी रात्री वरखेडे शिवारात बिबटय़ाने बैलाचा फडशा पाडून घोडय़ावरही हल्ला केला. दरम्यान, दोघांचे बळी घेणा:या बिबटय़ाने काहींवर जीवघेणे गंभीर हल्लेही केले आहेत. वनविभागाने लावलेल्या पिंज:यात तो अजूनही अडकला नसल्याने परिसरात त्याची दहशत कायम आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिलखोड, सायगाव, मांदुर्णे, उंबरखेड परिसरात बिबट्याने शेतमजुरांवर हल्ले केले आहेत. सुरुवातीला गुरांचा घास घेणा-या बिबट्याने गेल्या दोन महिन्यात एक मुलासह महिलेचाही बळी घेतला. अन्य तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे. गायीच्या वासरांची सोपी शिकार करणा:या नरभक्षक बिबटय़ाने मोठय़ा जनावरांवरही हल्ले सुरु केले आहेत. 20 रोजी वरखेडे शिवारात शेतात बांधलेल्या बैलावर झडप घालून त्याचा फडशा पाडला. याच रात्री परिसरातील एका शेतात बांधलेल्या घोडय़ावरही त्याने नजर रोखून हल्ला केला. सुदैवाने हा घोडा बचावला आहे. 

बिबटय़ा ‘मस्त’ वानविभाग ‘सुस्त’दरदिवशी बिबटय़ाच्या भितीचा थरार वाढत असून रात्रीच नव्हे तर दुपारीही शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. या परिसरात त्याच्या दहशतीने सन्नाटा पसरला आहे. एकटय़ा-दुकटय़ा शेतमजुराचे सावज हेरुन बिबटय़ा हल्लाबोल करतो. वनविभागाने पिलखोड, पिंपळवाड-म्हाळसा येथे पिंजरे लावले असले तरी बिबटय़ाने वनविभागाच्या हातावर  तुरीच दिल्या आहेत. यामुळे नागरिकांची वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संतप्त भावना आहे.