शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

टँकर पाणी घोटाळाप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:56 IST

भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील टँकर पाणी भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी टाकली आहे.

ठळक मुद्देनागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी घेतली दखलरेशनिंग दुकानांच्या तपासणीसंदर्भातही दुसरी लक्षवेधीदोन्ही प्रकरणांना ‘लोकमत’ने फोडली वाचा

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील महादेव तांडा येथील टँकर पाणी भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी टाकली आहे. त्यामुळे टँकर माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे आमदार केदार यांनी तालुक्यातील रेशनिंग दुकानाची करण्यात आलेल्या तपासणीसंदर्भातही दुसरी एक लक्षवेधी टाकली आहे.‘लोकमत’ने यासंदर्भात स्टिंग आॅपरेशन केले होते व या भ्रष्टाचाराचा पदार्फाश केला आहे. याची दखल आमदार केदार यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे ‘लोकमत’ने एप्रिल महिन्यामध्ये तूर व हरभरा दाळ घोटाळा प्रकरणाचाही केला होता. त्यानंतर मुंबई येथील राज्य दक्षता समितीने शहरात येऊन शहर व तालुक्यातील दुकानांची अचानक तपासणी केली होती. हे दोन्ही घोटाळे ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे.विधानसभेत लक्षवेधी क्रमांक १४०४० क्रमांकाने टाकण्यात आलेल्या लक्षवेधीमध्ये महादेव तांडा येथे गेल्या वर्षभरापासून एमएच-१९-झेड-१२२० या टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. सदर पाणी हे भुसावळवरून घ्यायचे आदेश होते. मात्र टँकरमालक हे जवळच असलेल्या कुºहे (पानाचे) गावामधून पाणीपुरवठा करीत असल्याची बाब मे महिन्यामध्ये समोर आली आहे. हे खरे, आहे का?असल्यास सदर ट्रॅकर मालक पाण्याचे पैसे भुसावळ येथून घेत असून पाणीपुरवठा मात्र कुºहे (पानाचे) येथून करीत असल्यामुळे त्याने शासनाचे लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याची बाबसुद्धा उघडकीस आली आहे. हे खरे आहे काय ?असल्यास सदर टँकरमालक व सोबत असलेल्या अधिकारी वर्गावर शासनाने कोणती कारवाई केली आहे, वा करण्यात येत आहे.नसल्यास अद्याप कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.ही लक्षवेधी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री त्याचप्रमाणे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे दाखल केली आहे.रेशनिंग दुकानसंदर्भातही दुसरी लक्षवेधीतर दुसरी लक्षवेधी १४०३९ या क्रमांकाने टाकली असून, आमदार केदार यांनी एप्रिल २०१९ मध्ये राज्य दक्षता समितीमार्फत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली आहे काय?असल्यास सदर तपासणी दरम्यान शहरातील व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानमध्ये किती दुकानदार यांची तपासणी अहवालात त्रुटी आढळल्या. त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे. कारवाई होत नसल्यास दिरंगाईचे कारण काय, अशी लक्षवेधी उपस्थित केली आहे.दरम्यान, ‘लोकमत’ला तूर व हरभरा डाळीची खाली पाकिटे कुºहे (पानाचे) येथील शेतीशिवारात मिळून आल्यानंतर या भ्रष्टाचाराला तोंड फोडले होते. त्यानंतर राज्य दक्षता समितीने तालुक्यातील दुकानांची अचानक तपासणी केली होती. दोन्ही बातम्या ‘लोकमत’ने दिल्या असून, नागपूर येथील काँग्रेसचे आमदार केदार यांनी या दोन्ही बातम्यांची दखल घेऊन लक्षवेधी मांडल्यामुळे टँकर माफिया व भ्रष्ट रास्त दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई