न्यायाधीश महोदयांनी समस्त ग्रामस्थांना न्याय, विधि, तसेच कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध खटले, तसेच प्रशासकीय न्यायपालिका यांची सखोल माहिती दिली.
ॲड.गजानन पाटील व डी.ए माळी यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी गावातील ज्येष्ठ मंडळी गोकुळ पाटील, हिरालाल पाटील, संतोष पाटील, आसाराम पाटील, कृष्णा मोरे, तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आशा पाटील व कैलास पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. सदर शिबिरास धरणगाव वकील संघटनेचे सदस्य सी.झेड. कटारे. ॲड.कैलास मराठे धरणगाव येथील नायब तहसीलदार सातपुते, कटारे विस्ताराधिकारी, ग्रामसेवक संदीप महाजन, तलाठी मनीषा पोटे आधी मान्यवर उपस्थित होते.