शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन

By admin | Updated: September 26, 2015 00:41 IST

पिंपळनेर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार करणा:या परप्रांतीय बोगस डॉक्टरवर शुक्रवारी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळनेर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना अॅलोपॅथी पद्धतीने रुग्णांवर उपचार करणा:या परप्रांतीय बोगस डॉक्टरवर शुक्रवारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा डॉक्टर साक्री तालुक्यातील वार्सा गावी दवाखाना चालवत होता. साक्री पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिका:यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

पश्चिम बंगाल राज्यातील परगना जिल्ह्यात असणा:या निलगंज येथील दीपकसिंग सुशांतसिंग राणा (वय 35) याने वार्सा गावात दवाखाना सुरू केलेला होता. मात्र, दीपकसिंग याच्याकडे अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करण्याचे कोणतेही मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नव्हते. तरीही तो स्वत:च्या फायद्यासाठी अवैधरित्या दवाखाना उघडून उपचारासाठी येणा:या रुग्णांवर अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करत होता. यासंदर्भात तक्रार आल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम शरदचंद्र वानखेडे यांच्या पथकाने शुक्रवारी वार्सा येथे जाऊन दीपकसिंग याच्या दवाखान्यावर छापा घातला.

पथकाने दवाखान्यातून अॅलोपॅथी औषधींचा साठा, इंजेक्शन, सिरींज, सलाईन, स्टेथोस्कोप असे साहित्य जप्त केले. यासंदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात डॉ.विक्रम वानखेडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 (1) (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.