शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘काश्मिरी तरुण काल, आज आणि उद्या’ विषयावरील व्याख्यानाने श्रोते थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:14 IST

रोटरी क्लबतर्फे आयोजित व्याख्यानास प्रतिसाद

जळगाव : गणपती नगरमधील रोटरी हॉल येथे ‘काश्मिरी तरुण काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानातील प्रसंगांनी उपस्थित थक्क झाले.या प्रसंगी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, सचिव पुष्पकुमार मुंदडा, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील उपस्थित होते. डॉ.राहुल मयूर यांनी परिचय करून दिला.काश्मिरी तरुण भरकटलेल्या स्थितीतडॉ. पाटील यांनी मार्गदर्शन करताना विविध अनुभव सांगत काश्मिरी तरुण हा भरकटलेल्या स्थितीत असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, काश्मिरातील तरुणांकडे असलेले ज्ञान, कला यांना वाव मिळायला हवा. त्यांचे ज्ञान हे चुकीच्या विचारसरणी असलेल्या व्यक्तींकडून हाताळले जात आहे असेही त्यांनी सांगितले.मनापासून दगडफेक करीत नाहीसर्वच तरुण मनापासून दगडफेक करीत नसून तिथल्या परिस्थिती नुसार त्यांना या कामी नको असतानादेखील ओढले जात आहे, असेही डॉ.पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ.पाटील यांनी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्यावतीने अनंतनाग, कुपवाडा, बिरवाह, श्रीनगर तसेच जम्मू येथील मुलींसाठी असलेल्या अनाथालयांची व संस्थेच्या काश्मीर खोऱ्यात असलेल्या एकूण अकरा रुग्णवाहिकांविषयी माहिती दिली.सदरील व्याख्यानास सर्व रोटरीचे सदस्य उपस्थित होते. रवींद्र वाणी यांनी आभार मानले.खोट्या संदेशांवर वर विश्वास ठेवू नकासोशल मीडियावरील काश्मीर बाबत खोट्या संदेशांवर वर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. भारतीय सैन्यदलात काश्मिरी युवक मोठ्या प्रमाणावर असून सैन्यात भरती होण्यासाठी सतत तयार असतात. बरेचसे युवक हे भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण होत आहेत तसेच बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या मदतीने महाराष्ट्रात काश्मिरी तरुणी वैद्यकीय, कायदा, संगणक अशा विविध शाखेचा अभ्यास करीत आहेत. काश्मीरमध्ये असलेले अशांततेचे वातावरण प्रेमाने, सामान्य काश्मिरी जनतेसाठी मदतीचा हात पुढे करून कमी होऊ शकते असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव