शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरील लाईट काढून वकीलाकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:56 IST

संभाजीनगरात सलग दुसरी घटना

जळगाव : बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या लाईट काढून तो कुंडीत ठेवून चोरट्यांनी संभाजी नगरात वकीलाचे घर फोडून ५५ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्यात चॉकलेटचा आस्वाद घेतानाच पान व गुटखा खाऊन ठिकठिकाणी पिचकाऱ्या मारल्या आहेत.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अ‍ॅड.श्यामसुंदर हरी सपकाळे यांचा संभाजी नगरातील गट क्र.४४८/१ व प्लॉट क्र.४८/ १ मध्ये बहिणाबाई नावाचा बंगला आहे. तेथे वडील अ‍ॅड. हरी दयाराम सपकाळे, आई मंगला, पत्नी पारुल व मुलगी स्वरा यांच्यासह वास्तव्याला आहेत. लहान भाऊ शंतनू मुंबईतील मुलुंड येथे एम.एस.आर्थोचे शिक्षण घेत असल्याने संपूर्ण कुटुंब ३ जुलैपासून त्यांच्याकडे गेले होते. गुरुवारी रात्री ११ वाजता ते कारने जळगावातील घरी परतले असता मुख्य दरवाजाचे लोखंडीचे गेटचे कुलुप तुटलेले होते तर आतील सर्वच दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तुटलेले होते. घरातील साहित्याचीही नासधूस झालेली असल्याने चोरी झाल्याचा अंदाज आला.वडील निवृत्त सचिवअ‍ॅड.श्यामसुंदर सपकाळे यांचे वडील अ‍ॅड. हरी सपकाळे हे मंत्रालयात विधी व न्याय विभागात उपसचिव होते. २०१३ मध्ये ते निवृत्त झाले. दरम्यान, १२ वर्षापासून बंगल्याला कुलुप असताना कधीच चोरी झाली नाही, आता रहिवासासाठी आल्यानंतर आठच दिवस बाहेर गावी गेलो आणि चोरीचा प्रकार घडला. दरम्यान, संभाजी नगरात बुधवारी देखील प्राध्यापकाकडे चोरी झाली होती. त्याच दिवशी ही चोरी झाल्याची शक्यता आहे.कपाटातील दागिने रोकड लांबविलीदोन्ही बेडरुमधील कपाट उघडे होते. लॉकरच्या चाव्या शेजारील कपाटातून काढून चोरट्यांनी अर्धा तोळे सोन्याचे कर्णफुले, दहा हजार रुपये रोख व ३० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, चमचे, वाट्या व ग्लास असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याचे अ‍ॅड.सपकाळे यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, घरात एका टोपलीत चॉकलेट आढळून आले. बेसीन तसेच भिंतीला लागून पान व गुटख्याचे थुंकलेले होते. घरात सर्वत्र अस्वच्छता होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अ‍ॅड.सपकाळे यांनी रात्रीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दीड वाजता पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी भेट दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव