शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

शेवटच्या अर्ध्या तासात माघारीसाठी अपक्ष उमेदवारांची मनपात धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:33 PM

उशिरा आलेल्यांची माघार नाकारली

ठळक मुद्देमनपाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांना अडविलेअपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणी

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत काही मोजक्या उमेदवारांनी माघार घेतली मात्र, दुपारी २ ते ३ या एका तासात अनेक उमेदवारांनी माघार घेतली. तर काही उमेदवार मुदत संपल्यानंतर मनपात पोहचल्याने ते माघार घेवू शकले नाही.अपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणीसोमवारपर्यंत २४ उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, १७६ हून अधिक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे अनेक उमेदवारांचे गणित यामुळे बिघडण्याची शक्यता होती.सोमवारी रात्री काहीअपक्ष उमेदवारांच्या घरी जावून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. हे प्रकार मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होते. त्यामुळे शेवटच्या अर्धातासात अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली.‘डमी’ उमेदवारांनी सकाळीच घेतली माघारउमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी दरम्यान अर्जामध्ये त्रुटी राहिल्यास उमेदवारांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी खबरदारी म्हणून आपल्याच कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये ‘सबकुछ ओके’ झाल्यामुळे ‘डमी’ उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली.एक तास शिल्लक असतानाही पाहिली फोनची वाटमाघारीसाठी आपल्या विनवण्या केल्या जातील या अपेक्षेने काही काही उमेदवार मनपाच्या आवारात सकाळपासून उपस्थित होते. मात्र, कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून फोन किंवा कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे शेवटच्या तासात अर्ज मागे घेतले.तर काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली.मुदत संपल्यानंतरही आले उमेदवार, मात्र प्रवेश नाकारलामंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र, अनेक उमेदवार हे दुपारी ३ वाजेनंतर मनपात दाखल झाले.यामध्ये प्रभाग ३ क च्या अपक्ष उमेदवार रुपाली वाघ, संग्राम सूर्यवंशी यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश होता.दुपारी ३ वाजता निवडणूक कक्षाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले. त्यानंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देण्यात आला नाही.त्यामुळे त्यांना माघार घेता आली नाही.वेळ कमी राहिला, लवकर घेऊन यामाघारीची वेळ जसजसी जवळ येत होती तसतशी एका पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाºयांची लगबग वाढताना दिसून आली. नेते आपल्या कार्यकर्त्यांना अमूक या उमेदवारास माघारीसाठी लवकर घेऊन या, अशा सूचना देत होते. प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल ते होईल, मात्र आज माघारीच्या अखेरच्या दिवशी आपल्या उमेदवाराविरोधात असलेले जास्तीत जास्त उमेदवार कमी कसे करता येतील, त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी ‘साम, दाम, दंड’या मंत्राचे पालन होत असल्याचे चित्र होते. मनधरणी झाल्यानंतर त्याला माघारीस नेण्यासाठी चारचाकी वाहनांचीदेखील तयारी करून ठेवलेली होती. हे सर्व करीत असताना हातातील घड्याळातील वेळेकडे लक्ष होते.माघार घेणाºयांसाठी प्रवेशव्दारापर्यंत चारचाकीची व्यवस्थाप्रमुख पक्षांमधील काही नाराज पदाधिकाºयांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घ्यावी यासाठी महत्वाच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतलेला दिसून आला. अपक्ष उमेदवारांचे मन वळविण्यात यश मिळाल्यानंतर संबधित उमेदवाराला मनपाच्या प्रवेशव्दारापर्यंत सोडण्यासाठी चारचाकीची व्यवस्था करून देण्यात आली होती.काही अपक्षांना माघार न घेण्यासाठीही विनवण्याएकीकडे काही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाºयांकडून मनधरणी सुरु असताना, काही अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवावी यासाठी मनधरणी सुरु असल्याचेही मनपाच्या परिसरात दिसून आले. अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्यास विरोधातील उमेदवाराचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानेही अनेकांनी अपक्ष उमेदवार रिंगणात रहावेत यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव