शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

६९५ वर्गखोल्या मोजतायेत शेवटची घटका; जिल्हा परिषद शाळांची देखभालअभावी दैना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 14:38 IST

एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़.

ठळक मुद्दे एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़. यात २१२ शाळांमधील ५७२ वर्ग खोल्या धोकादायक आहेत.

- किशोर पाटील 

जळगाव : एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़. यात २१२ शाळांमधील ५७२ वर्ग खोल्या धोकादायक आहेत. जि़प़चा निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून शाळांच्या दुरुस्तीसाठी धडपड सुरु असल्याचे चित्र आहे़

जिल्हा परिषदेतर्फे पहिली ते आठवी डिजिटल अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांचे गेल्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले होते. अभ्यासक्रम डिजिटल असला तरी प्रत्यक्षात तो शिकविला जाणाऱ्या शाळांची दयनीय अवस्था असल्याने सभापती पोपटराव भोळे यांनी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती़ पालकमंत्र्याही होकार दर्शवित जिल्हा परिषदेला शाळांच्या स्थितीबाबचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना किरकोळ दुरुस्ती, मोठी दुरुस्ती, धोकेदायक व जीर्ण इमारती याप्रमाणे शाळाच्या वर्गखोल्याची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते़, अशी माहिती सर्व शिक्षा अभियनातील कार्यकारी अभियंता मृदुल अहिरराव यांनी दिली.

शिक्षण विभागाने माहिती संकलित करून याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रत्यक्ष भेटीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला आहे़ त्यामुळे त्यांच्याकडून लवकर निधीची पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फक्त किरकोळ दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांकडून निधीशाळांच्या माहिती अहवालासह मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील यांनी मुंबई येथे जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती़ त्यानुसार पालकमंत्र्यांनी किरकोळ दुरुस्ती असलेल्या शाळांच्या वर्गखोल्यांसाठी सीएसआरमधून (विशेष निधी) निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर मोठी दुरुस्ती असलेल्या वर्गखोल्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे़

जिल्हा परिषद शाळांच्या पडक्या खोल्याविषयी माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मोठ्या दुरुस्तीसह धोकादायक खोल्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. जळगाव.

१८४७   जिल्हा परिषदच्या एकूण शाळा६१४    सुस्थितीत१२३३  शाळांची दयनीय अवस्था२१२   शाळांमधील ५७३ वर्ग खोल्या धोकादायक२३२   शाळांमधील ६९५ वर्गखोल्या पडक्या अवस्थेत८१३   वर्गखोल्यांची मोठी दुरुस्ती६०८  वर्गखोल्याची किरकोळ दुरुस्ती