शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

धगधगत्या काश्मीर खोºयात रुग्णसेवा

By admin | Updated: May 25, 2017 00:50 IST

जळगावातील डॉक्टरांकडून ३७०० जणांवर उपचार : मोर्चा काढून शिबिराला झाला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जम्मू-काश्मीर सारख्या अतिसंवेदनशील, नेहमीच अतिरेकी हल्ले, गोळीबार, सतत दहशतीचे वातावरण, अतिरेकी कारवाया याची तमा न बाळगता तेथील जनतेच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि त्यांना आपलेसे करावे, या हेतूने जळगाव, नाशिक येथील डॉक्टरांनी १० ते २० मे या काळात काश्मीरमधील सीमारेषेवर मोफत आरोग्य सेवा केली. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिराला कट्टकपंथीयांचा विरोध, मोर्चे काढून तपासणी रोखण्याचा प्रयत्न होऊनही हे डॉक्टर मागे हटले नाही. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक  अदिक कदम यांच्यासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून जुळलेले व या संस्थेचे समन्वयक, जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावातीलच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.जितेंद्र मोरे, नाशिकचे डॉ. मधुकर आचार्य, डॉ.रामदास भोई, डॉ.शेखर मगर, डॉ. सुदेश बोरा, डॉ.सचिन भांबेरे व व्यवस्थापक  ऋषिकेश परमार यांनी सदरील काळात काश्मीर खोºयात आरोग्यसेवा दिली.कट्टरपंथीयांचा विरोधत्रेहगाम येथे काही कट्टरपंथीयांचा विरोधही  झाला, मात्र याला न जुमानता तेथील डॉक्टर्स व कर्मचारी यांनी सदरील शिबिरासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या चमुला आधार दिला तसेच भारतीय सैन्यदेखील दवाखान्यात हजर झाले. बिरवाह येथे आरोग्य शिबिर सुरू असताना मोठा निषेध मोर्चा निघाला तेव्हा स्थानिक जनता व रुग्णांनी डॉक्टरांच्या या चमुला वेढा घातला व संरक्षण देऊन शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले. या शिबिरादरम्यान सुमारे ३७०० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन प्राथमोपचार करण्यात आले.  भविष्यात फाउंडेशनतर्फे जम्मू येथे अनाथालय व शाळेसाठी जागा घेण्यात येणार आहे. काश्मीर  हे केवळ सैनिक व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी नसून आपलीदेखील जबाबदारी आहे या विचाराने आम्ही हे कार्य करीत आहोत.-डॉ. धर्मेंद्र पाटील, समन्वयक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन