शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

चोरट्यांनी लांबविले लाखाचे लग्नाचे दागिने

By admin | Updated: March 20, 2017 00:28 IST

समतानगरातील पवार कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर : मजुरी करुन पोटाला चिमटा देत बनविले होते २३ ग्रॅम सोने व ७ तोळे चांदीचे दागिने

जळगाव : मजुरी करुन पै अन् पै गोळा केले. घरात किंवा बॅँकेत पैसे ठेवले तर ते खर्च होतात, मुलांच्या लग्नासाठी धावपळ नको म्हणून २३ ग्रॅम सोने व ७ तोळे चांदीचे दागिने बनवून घरात ठेवले आणि पुन्हा कष्ट करण्यासाठी पुण्याला गेलेल्या पवार कुटूंबाच्या घरातून चोरट्यांनी कष्टाची कमाई लुटून नेल्याची घटना समता नगरात रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. कैलास हरिश्चंद्र पवार यांचे समता नगरातील बेलदार वाड्यात पत्र्याचे घर आहे. पत्नी संगिता, मुलगा योगेश, आकाश व मुलगी आशिका आदी सर्व जण गवंडी काम करुन पोट भरतात. मुलगी आशिका व मुलगा योगेश या दोघांचे यंदा लग्न करण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी दागिने घेतले होते. कोठीचे कुलूप उघडून दागिने लांबविलेघरात चोरी झाल्याचे समजताच पवार हे तातडीने पुण्याहून जळगावकडे निघाले. शनिवारी रात्री साडे अकरा वाजता ते घरी पोहचले. घरात पाहणी केली असता कपाट उघडे होते तर कोठीत कापडात गुंडाळून ठेवलेले दागिने गायब झाले होते. पवार यांनी ही घटना सकाळी रामानंद नगर पोलिसांनी कळवली असता सहायक निरीक्षक अरविंद भोळे, उपनिरीक्षक राजेश घोळवे, अरुण निकुंभ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीची पध्दत पाहता जाणकार व ओळखीच्याच व्यक्तीने हा प्रकार केला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना यावेळी पाचारण करण्यात आले होते.शेजारच्या घराचेही तोडले कुलूपपवार यांच्या शेजारीच राहणारे भिमराव मुरलीधर मोरे यांच्या बंद घराचेही कुलूप चोरट्यांनी तोडले आहे. घरात कोणीही राहत नसल्याने येथे चोरट्यांची निराशा झाली. दरम्यान, एक महिनाआधीही याच परिसरात जितेंद्र विनायक सपकाळे यांच्याही बंद घरातून चोरट्यांनी ८ हजार रुपये लांबविले होते. सपकाळे एका दिवसासाठी परिवारासह बाहेर गावी गेले होते, त्यामुळे घर बंद होते. मागचा दरवाजा उघडून किचनमध्ये ठेवलेल्या डब्यातून चोरट्यांनी ही रक्कम लांबविली होती. 

 

रोजगारासाठी पुण्यात गेले अन् चोरट्यांनी डाव साधला... पवार कुटूंब गवंडी काम करते. शहरात रोजगार मिळत नसल्याने ते मुळशी, जि.पुणे येथे गेले होते. तेथे एका हॉटेलच्या बांधकामाच्या ठिकाणी हे कुटूंब काम करीत होते.त्यामुळे ५ ते १८ मार्च या कालावधीत त्यांच्या समता नगरातील घराला कुलूप होते.पवार यांच्या शेजारी राहणारे गणेश भरत कुमावत हे शनिवारी सकाळी ब्रश करत असताना समोरील पवार यांच्या घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. पवार कुटूंब पुण्याला गेले असताना दरवाजा कसा उघडा आहे, म्हणून त्यांनी चौकशीसाठी घराकडे धाव घेतली असता कपाटही उघडे होते तर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते.त्यांनी हा प्रकार पवार यांची बहिण चंद्रकला चव्हाण यांना सांगितला तर त्याच वेळी दुसरी बहिण अरुणाबाई मोहीते या नातवासाठी दूध पावडर घेण्यासाठी येत होत्या.त्यांनी ही घटना पवारांना कळवली.