शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नेरी येथे जलकुंभाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 18:18 IST

नेरी बुद्रूक गावाची नेहमीचीच पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता एका नवीन जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले.

नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : नेरी बुद्रूक गावाची नेहमीचीच पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता एका नवीन जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय पेयजल योजनेतुन या जलकुंभाची उभारणी होणार आहे.जामनेर रोडलगत असलेल्या नवीन रहिवास भागाच्या उंच परिसरात या जलकुंभाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी सरपंच पंढरी वाघोडे, प्रभारी सरपंच भगवान इंगळे, रतिलाल भोई, प्रभुदास इधाटे, संजय तायडे, रवींद्र भोई, नीलेश पाटील, रवींद्र पाचपोळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.कंडारी, ता.जळगाव येथील वाघूर धरणातून नेरीसह आठ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजना गेल्या २० वर्षांपासून सुरू होती. मात्र योजनेत सातत्य नसल्याने संबंधित गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यातच वीजबिल आणि तांत्रिक अड़चणीमुळे ही योजना बंद अवस्थेत पडलेली आहे. गावाची पाणीटंचाई समस्या कायमची बंद व्हावी याकरीता माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी तीस लाख रुपये निधीदेखील मंजूर झालेला होता. वाघूर धरणाच्या बॅक वॉटरजवळील जुने चिंचखेडे या गावाजवळ विहीर करून पाईपलाईन टाकन्यात आलेली होती. त्यामुळे याठिकाणी दीड लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच भगवान इंगळे यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीJamnerजामनेर