शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीतील लेकीसाठी प्रत्येक तालुक्यात लागणार एक दिवा

By admin | Updated: July 12, 2017 12:40 IST

कोपर्डीतील अमानवी अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेला १३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे़

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - कोपर्डीतील अमानवी अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेला १३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे़ या लेकीसाठी बुधवारी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात शहरातील मुख्य चौकात एक दिवा प्रज्वालित करून श्रध्दांजलीपर संवेदना व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डी़डी़बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली़एक दिवा लेकीसाठी याअंतर्गत कोपर्डीतील लेकीला श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे़ त्याबाबत माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाव्दारे नूतन मराठा महाविद्यालयातील जगदीशचंद्र बोस सभागृहात पत्रकार परिषद झाली़ अ‍ॅड़ विजय पाटील, संगीता पाटील, डॉ़ राजेश पाटील, श्रध्दा पाटील, नगरसेविका लीना पवार, विनोद देशमुख, संदेश भोईटे, चंद्रकांत कापसे, बाळासाहेब सूर्यवंशी, भिमराव मराठे, संजय पवार, बाळासाहेब सूर्यवंशी, हेमंतकुमार साळुखे, प्रमोद पाटील, श्रीराम पाटील, सचिन सोमवंशी, अ‍ॅड़सचिन चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील, प्रा़राजेंद्र देशमुख, प्रा़सुनील गरुड आदी उपस्थित होते़शासनाची जलदगतीने न्याय देण्याची घोषणा पोकळ ठरलीलेकीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाव्दारे राज्यभर मूक मोर्चा काढण्यात येऊन शासनाने लक्ष वेधण्यात आले होते़ सरकारतर्फे सहा महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाव्दारे न्याय देण्याची घोषणा केवळ पोकळ ठरली़ त्यामुळे जलद न्यायाच्या मागणीसाठी तसेच सरकारव्दारे वेळकाढूपणाच्या वृत्तीला लगाम लावण्यासाठी अवघा मराठा समाज १३ रोजी एकत्र येत आहे़ प्रत्येक तालुक्यात, शहरातील प्रमुख चौकांमध्ये एकत्र येऊन एक दिवा प्रज्वालित करावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे़ यात कुठल्याही घोषणा, कुठलीही प्रार्थना, तसेच वाहतुकीला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे़काळ्या फित लावून काम कराघटनेच्या निषेधार्थ गृहिणी, नोकरदार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, उद्योजक तसेच शेतकरी आदी सर्वांनी उजव्या हाताला काळ्या रिबीन लावून कामकाज करावे़ असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाव्दारे करण्यात आले आहे़