शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:03 IST

बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे.

ठळक मुद्देसचिवांच्या आडमुठ्या धोरणाला सर्वच त्रस्तबोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे.

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. पण जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य खरेदी-विक्रीसाठी सूट देण्यात आली. पण पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिवांच्या आडमुठ्या धोरणामुळे आजूबाजूला सर्व ठिकाणी कृउबाचे मार्केट सुरू झाली. पण पारोळा येथे अद्यापपर्यंत कृउबा माल खरेदी विक्री बंद आहे. बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे.प्रत्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पाहिले असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय बंद होते. काही व्यापाºयांनी शेतकºयांचे गहू, बाजरी धान्य खरेदी केले होते. १७०० रुपयांचा भाव शेतकºयांना गव्हासाठी मिळाला होता. यात काही शेतकºयांना विचारणा केली असता त्यांनी घरात कापूस पडून आहे. आलेल्या अन्नधान्य गहू, बाजरी, दादर ठेवण्यासाठी जागा नाही. शेतातून थेट मार्केटला विक्रीसाठी आणले. यात काही व्यापाºयांनी उधारीवर माल खरेदी केला, तर काहींनी ट्रॅक्टर भाडे व उचल म्हणून थोडे फार पैसे दिले. नाईलाजाने उधार धान्य विक्री करावे लागल्याचे बोलून दाखविले.यावेळी काही व्यापाºयांनी सचिव रमेश चौधरी यांनी शेतकºयांचा माल खरेदीसाठी लॉकडाऊनचे कारण पुढे करीत मार्केट बंद ठेवले आहे. सचिवांच्या तोंडी सूचनेने आम्ही काही व्यापाºयांनी शेतकºयांचा गहू, ज्वारी, बाजरी खरेदी केले आहे. पण हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी आम्ही गुजराथला पाठवितो. व्यापारी म्हणून आम्ही माल खरेदी केला आहे, असे परवाना पत्र सचिवांकडे मागणी आम्ही व्यापाºयांनी केली. त्यांनी ते पत्र देण्यास नकार दिला. तहसीलदारांना परवाना पत्र मागणी केली. पण त्यांनीही सचिवांना तसे पत्र देण्याचा अधिकार देण्यात आले असल्याचे सांगितले. पण सचिव चौधरी हे व्यापाºयांना विनाकारण त्रास देत आहेत. अनेक वेळा परवाना पत्र मागूनसुद्धा त्यांनी पत्र दिले नाही. आमच्या मालाने भरलेल्या गाड्या दोन दिवस पडून होत्या. शेवटी अमळनेर तहसिलदारांंनी आम्हाला परवाना पत्र दिले. मग आमच्या माल भरलेल्या गाड्या विक्रीसाठी गुजराथ गेल्या असल्याचे एका व्यापाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली .त्यानंतर एक मापडी भेटला. त्यांनीही सचिव रमेश चौधरी यांनी शेतकºयांच्या आलेल्या मालाचे माप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत म्हणून रिकाम्या हाताने बसलो आहे, तर व्यापाºयांनी शेतकºयांकडून विक्रीसाठी आलेले धान्य मोजणी व तोलाई व भरण्यासाठी फक्त दोनच हमाल मदत करतील, अशी सूचना सचिव यांनी दिली आहे.या वेळी हमालांनी आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कसे तरी हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतकºयाचे एखादे ट्रॅक्टर आले, की दोनच हमाल संपूर्ण माल कसा मोजतील आणि भरतील? सचिव चौधरी यांच्या आडमुठ्या धोरणाला आम्ही कंटाळलो असल्याच्या भावना हमाल वर्गाने बोलून दाखविल्या .याबाबत सचिव रमेश चौधरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, मार्केट चालू करावे का याबाबत तहसिलदारांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती दिली.तहसीलदार अनिल गवांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सचिवांना नियमानुसार खरेदी सुरू करा. जास्त गर्दी होणार नाही, शेतकºयांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. आता या लपाछपीत शेतकºयांचा माल खरेदीसाठी कृउबा मार्केट केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :MarketबाजारParolaपारोळा