शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश पत्र नसल्याने ९ परीक्षार्थी स्टेनो परीक्षेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:53 IST

भुसावळच्या क्लास चालकाने केली नाही त्रुटींची पूर्तता

जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या टंकलेखन आणि लघुलेखनच्या (स्टेनो) परीक्षेदरम्यान स्टेनो परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) न मिळाल्यामुळे जळगावातील केंद्रावरील ९ विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून भुसावळ येथील क्लास चालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना हा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील पुष्पांजली या खाजगी टंकलेखन क्लास चालकाने त्यांच्याकडे प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली. मात्र या क्लासमध्ये काही त्रुटी असल्याने संबंधित क्लास चालकाला परिषदेने सुनावणीसाठी तीनवेळा पुणे येथे बोलविले. तरीदेखील क्लास चालक सुनावणीला गेले नाही. त्यामुळे शेवटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुष्पांजली सेंटर खंडीत (ब्लॉक) केले. सेंटरच ब्लॉक झाल्याने तेथील ९ परीक्षार्थींना प्रवेश पत्रही (हॉल तिकीट) मिळाले नाही.बुधवार, २४ रोजी सकाळी परीक्षार्थी स्टेनोची परीक्षा देण्यासाठी जळगावातील विद्या निकेतन शाळेतील केंद्रावर पोहचले. मात्र हॉल तिकीट नसल्याने परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या ९ जणांना परीक्षा देता आली नाही.याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून संबंधित क्लास चालकाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला गेला. मात्र वारंवार संपर्क साधूनही क्लास चालकाने प्रतिसाद दिला नसल्याचे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला संबंधित माहिती देऊन मार्गदर्शन मागविले आहे.या संदर्भात ‘लोकमत’नेही क्लास चालकाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव