जळगाव : विहिरीतील गाळ काढताना अचानक साखळी तुटल्याने शिकाईमध्ये बसलेले योगेश गणपत जोगी (वय ३०) व लक्ष्मण यशवंत जोगी (वय ३२) दोन्ही रा.भागदरा,ता.जामनेर हे दोन मजूर विहिरीत पडल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता मोयगाव, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जामनेर तालुक्यातील मोयखेडा येथील भादू राजपूत यांच्या मालकीच्या भागदरा ते मोयखेडा रस्त्यावर असलेल्या विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरु होते. तेथे योगेश जोगी, लक्ष्मण जोगी हे गाळ काढण्याच्या शिकाईत तर रमेश पंडीत जोगी व संजय हिरामण जोगी हे विहिरीत होते. तर दोन जण गाळ घेण्यासाठी वर होते. गाळ भरलेली शिकाई खालून ३० फूट उंच आल्यावर त्याची तारेची साखळी अचानक तुटली. हा प्रकार लक्षात येताच विहिरीत थांबलेले दोघं जण बाजूला सरकले, त्यामुळे ते बालंबाल बचावले तर शिकाईत बसलेले योगेश व लक्ष्मण या दोघांना जबर मार बसला. गाळ असल्याने तेही बचावले.त्यांच्या डोक्याला, पायाला व छातीला मार लागला आहे.
मोयगाव येथे साखळी तुटल्याने विहिरीत पडले मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:21 IST
विहिरीतील गाळ काढताना अचानक साखळी तुटल्याने शिकाईमध्ये बसलेले योगेश गणपत जोगी (वय ३०) व लक्ष्मण यशवंत जोगी (वय ३२) दोन्ही रा.भागदरा,ता.जामनेर हे दोन मजूर विहिरीत पडल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता मोयगाव, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोयगाव येथे साखळी तुटल्याने विहिरीत पडले मजूर
ठळक मुद्देजामनेर तालुक्यातील मोयगाव येथील घटनानशीब बलवत्तर म्हणून बचावले चौघेजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु