रावेर : तालुक्यातील केर्हाळे बुद्रूक येथील एका घराच्या नवीन बांधकामासाठी जुने स्लॅबचे घर मजुरीने पाडत असताना काँक्रिट स्लॅब अंगावर कोसळून पडल्याने फिरोज रुबाब तडवी (३८, रा. केर्हाळे खुर्द, ता. रावेर) हा गंभीर जखमी झाला. त्यास गंभीर अवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, केर्हाळे बुद्रूक येथील वैभव वासुदेव महाजन यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी जुने घर पाडण्यासाठी मजूरीने गेलेला मजूर फिरोज रुबाब तडवी (वय ३८) याच्या डोक्यावर काँक्रिट स्लॅब कोसला. ही घटना ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, त्यास रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलवले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी तो मृत असल्याचे घोषित केले.
फिरोज हा आई-वडिलांचा एकुलता एक व घरातील कर्ता मुलगा असून, पत्नी तथा लहानग्या मुलांसह संसार उघड्यावर पडल्याने केर्हाळे खुर्द येथे शोककळा पसरली आहे.
रावेर पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महाजन यांनी शवविच्छेदन केले. केर्हाळे खुर्द येथील दफनभूमीत त्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. नीलेश चौधरी पुढील तपास करीत आहेत.
===Photopath===
031220\03jal_1_03122020_12.jpg
===Caption===
फिरोज तडवी