शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या जंगलात कोकण सुरण, मालमपुरा रोटाला दुर्मीळ वनस्पतींची नोंद!

By ajay.patil | Updated: August 24, 2022 15:21 IST

Satpura forest : जळगाव शहरातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे डॉ.तन्वीर खान यांनी ही नोंद केली असून, सातपुड्याच्या जंगलात पहिल्यांदाच दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या या वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव - जिल्ह्याला लाभलेल्या सातपुड्याच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती व प्राण्यांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असून, आता त्यात  कोकण सुरण (अमार्फोफॅलस कॉनकेनन्सीस) व मालमपुरा रोटाला (रोटॅला मालमपुजहेन्सीज) या दुर्मीळ वनस्पतीची भर पडली आहे. जळगाव शहरातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे डॉ.तन्वीर खान यांनी ही नोंद केली असून, सातपुड्याच्या जंगलात पहिल्यांदाच दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या या वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे.

या नोंदीची ‘इंडियन जनरल ऑफ प्लांट सायन्स’ या विज्ञान पत्रिकेमध्ये या नोंदीच्या शोधनिबंध  देखील प्रसिध्द करण्यात आला आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती  आढळून येत आहेत. या वनस्पती अभ्यासकांचे यश म्हणता येईल. एच.जे.थीम महाविद्यालयाचे वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान यांनी अनेक दुर्मीळ वनस्पतींची सातपुडा मध्ये नोंद  केली आहे. त्यांच्या या नोंदीत कोकण सुरण आणि मालमुरा रोटाला यांचीही भर पडली आहे.

कोणत्या भागात आढळते ही वनस्पतीपर्वत उतार आणि गवताळी भागामध्ये कोकण सुरण ही वनस्पती आढळूने येते. या वनस्पतींचे कंद वर्तुळाकार, लांबट पाने, फुलांचे आवरण फिकट तपकीरी, आतुन लाल व त्यामध्ये तीन प्रकारची फुले असतात. त्याचप्रमाणे पाणथळ व खडकाळ जागांवर मालमपुर रोटाला ही वनस्पती आढळून येते. नयनाकृती पाने, किरमीजी रंगाचे फुल,  पानांना जोडून येतात. या वनस्पतींच्या नोंदी डॉ.खान यांनी पुणे विद्यापीठाचे डॉ.मिलींद सरदेसाई यांना पाठविले असता, त्यांनीही वनस्पतींच्या पृष्टीकरणास दुजोरा दिला आहे. तसेच या नोंदीसाठी डॉ.खान यांना अजहर शेख व उमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

सातपुडा पर्वत रांग ही दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. काळानुरूप इथे नव-नवीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध लागत आहे. अशा वनस्पतींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगेचे पूर्ण देशासाठी महत्व वाढत आहे.- डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक

टॅग्स :Jalgaonजळगाव