यावल : येथील रिक्त नगराध्यक्षपदाचा भार उपनगराध्यक्ष यांचेकडे सोपवण्यात यावा अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार हे जसे यांनी येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांना ७ डिसेंबरच्या पत्रान्वये आदेश प्राप्त झाले आहेत. उपनगराध्यक्ष पद हे राकेश कोलते यांचेकडे आहे.येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या रीक्त झालेल्या हे पद सध्या उपनगराध्य राकेश कोलते यांच्याकडे सोपविले आहे, मुख्याधिकारी तडवी यांनी सांगितले.
यावल प्रभारी नगराध्यपदी कोलते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:30 IST