शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

खाटेला पाठ असणाºया वयात कोळगावच्या वृद्धाची सायकलवर टांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 7:00 PM

वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत.

ठळक मुद्देसायकलीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसायकान्हुमातेच्या वह्यांचा उपासकपहाटे लवकर उठत सायकलवर भ्रमंती

आॅनलाईन लोकमतखेडगाव, ता-भडगाव,दि.२८ - वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत.साठी-पासष्टी नंतर खरेतर खाटेला पाठ लागते. परंतु खाटेला पाठ म्हणजे दुखण्याला आमंत्रण ही खुणगाठ पक्की बांधुन, आजही माळी हे दुचाकी वाहन घेण्याची ऐपत असतांनाही सायकल सोडत नाहीत. वयाच्या दहाव्या वर्षापासून सायकल चालविण्यास शिकलेले माळी आजवर सायकल हेच आपले जीवन मानत संसारचक्र ते फिरवित आहेत.

असे जुळले सायकलीशी नाते...माळी यांच्या लहानपणी घरात अठराविश्वे दारिद्रय होेते. पाणी पिण्यास भांडे नाही.'केयना फोतरा (केळीचे सालटे) खाऊन त्यांनी दिवस काढले. आधी चहा हॉटेलमध्ये कपबशा धुण्याचे काम केले. नंतर कोळगाव बसस्थानकात चहाची टपरी टाकली. एक आणे चहा पासुन व्यवसाय केला. चहाच्या व्यवसायाला काही जण कमी लेखतात. मात्र माळी यांनी या व्यवसायावरच पाच एकर शेती, दोन मुलींचे लग्न, दोन मुलांचा संसार ओढला. चहाचा व्यवसाय मुलाकडे दिला आणि त्यांनी सायकलसोबत नाते जोडले.

सायकलीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसायमाळी समाजाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय प्रचलित आहे. त्यानुसार त्यांनी खेडोपाडी सायकलवर फिरत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. पहाटे लवकर उठत सायकलवर भ्रमंती करीत आजूबाजूच्या खेड्यात त्यांनी भाजीपाला विक्रीस सुरुवात केली. शरीर थकले तसे भाजीपाल्याचे जड वजन पेलवेना म्हणून हलके वजन असलेला लसुण आज ते खेडोपाडी विक्री करीत आहेत.

कान्हुमातेच्या वह्यांचा उपासकभगवान माळी हे बरीच वर्ष वही मंडळात होते. कान्हुमातेच्या वह्या त्यांनी अनेक गावातून गायल्या आहेत. अशा कार्यक्रमात रात्रभर जागरणासाठी ते राजा शनीविक्रम या नाटिका सादर करीत होते. या कलेपुढे तमाशा मंडळाचे कार्यक्रम फिके पडत असल्याचा अनुभव ते सांगताना, ' माय कुवारी, बाप ब्रम्हाचारी, मुलगा जन्मता घरी, तोच मुलगा बापाच्या लग्नात आहेर करी...! असा नाटकातला संवाद तोंडपाठ मात्र खड्या आवाजात ते म्हणतात.

टॅग्स :Bhadgaon भडगावJalgaonजळगाव