शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

जाणता परमार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:49 IST

अध्यात्म

जाणता परमार्थ हा शब्द जरासा नवीनच वाटतो परंतु ज्ञानदृष्टीने विचार केल्यास त्यातील रहस्य लक्षात येते़ परमार्थ भक्ती, उपासना, आराधना, साधना, यासर्वामध्ये जाणतेपण असणं खूपच महत्वपूर्ण अर्थात आवश्यकच नव्हेतर अत्यावश्क ठरत़ उदा़ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलय ‘गुरू जाणिते भजीजे.. म्हणजेच गुरू जाणतेपणाने भजावा आणि स्वीकारावा़ आपणा सर्वाना जाणता राजा शब्द वा कल्पना माहित आहे़ परंतु मग जाणता परमार्थ म्हणजे नेमकं काय़ परमार्थ व जाणता परमार्थ यामध्ये नेमके साम्य काय़ वा नेमकं वेगळपण काय? आपण सर्व भाविक भक्त श्रद्धाळू भावनेने मंदिरात देवदर्शनासाठी जातो़ तेथील देवळाला प्रदक्षिणा घालतांना प्रदक्षिणा मार्गात देवळाचे मागील बाजूस देवाचे पाठीस (मागचे बाजूस) मस्तक टेकवून नमस्कार करतो़ परंतु त्या भाविकास जर त्याचे कारण विचारले तर सांगता येईलच असे नाही़ फारच आग्रहपूर्वक विचारल्यास माहित नाही़ आधीच्या व्यक्तीने केला म्हणून आम्हीही केला किंवा तुम्हाला वाटले तर करा़ असे सांगितले जाते़ देवाला पाठीमागे नमस्कार करणे हा झाला परमार्थ़ मात्र या मागचे कारण लक्षात घेऊ या़सतत देवाने आपल्या पाठीशी राहावे, म्हणून देवाचे पाठीमागे नमस्कार करावा़ हा कार्यकारण भाव जाणून आपला परमार्थ करत राहावा यालाच म्हणावे जाणता परमार्थ. यातून आता आपला दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करूया़ श्रद्धेतून दृढ श्रद्धेकडे जावू या़ श्रीमद ्भागवत महापुराणात मन एवं मनुष्याणाम् कारण बंध मोक्षयो़.. असे म्हटले आहे. मनुष्याचे मन हेच त्याला बंधनात टाकायला किंवा मुक्त करायला कारणीभूत होय़ म्हणूनच प्रत्येकाने आपली भक्ती, परमार्थ हा जाणतेपणाच्या जाणीवेतून केल्यास आपला परमार्थ प्रगल्भ दृष्टीने होऊ लागतो व उच्चकोटीच्या परमानंदाची अनुभूती होऊ लागते़ त्यावेळी श्रीमद भागवतामधील श्लोकाचा परमानंद अनुभवता येतो़ प्रपंच वा परमार्थ उभय ठिकाणी ज्ञान, जाणीव, जाणतेपण महत्वाचे ठरते़ भगवतगीतेमध्ये देखिल म्हटले आहे, नही ज्ञानेन सदृश्यं पवित्रामिह विद्यते़ ज्ञानासारखे पवित्र, महत्वाचे दुसरे काहीच नाही़ भगवंत भक्ती म्हणजे भक्ती, ज्ञान, व वैराग्य हि त्रिसूत्री होय़ ज्ञान, जाणतेपण, जाणीवेमधील राणीव याचे महत्व सुभाषितामध्ये देखिल आढळते़ आपल्या धार्मिक कथा प्रसंगामधील कार्यकारणभाव, रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेत परमार्थाकडून जाणता परमार्थ अंगिकारू या़ जसे पार्वतीने अंगावरचा मळ काढून मूर्ती तयार केली़ शबरीने श्रीरामास उष्टी बोरे खाऊ घातली़ या सारख्या कथा प्रसंगा मधील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करू या व जाणत्या परमार्थाचा मार्ग धरू या़-मुकुंद धर्माधिकारी, जळगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव