शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापाला मारायला घेतलेला चाकू मुलाच्याच पोटात घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST

जळगाव : मद्यप्राशन केल्यामुळे खडसावल्याचा राग आल्याने मुलाने घरातील चाकू घेऊन बापावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात बचाव करताना ...

जळगाव : मद्यप्राशन केल्यामुळे खडसावल्याचा राग आल्याने मुलाने घरातील चाकू घेऊन बापावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात बचाव करताना हिसकावलेला चाकू मुलाच्याच पोटात घुसल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता बालाजी पेठेत घडली. सौरभ सुभाष वर्मा (२६) असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनीपेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष वर्मा हे सोने, चांदीचे व्यापारी असून शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी पेठेत ते कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुलगा सौरभ याला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. शुक्रवारी रात्री १० वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांनी त्याला खडसावले, त्याचा त्याला राग आला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सौरभने घरातील चाकू आणून वडिलांना धमकावले. दारुच्या नशेत मुलाकडून चाकू कोणालाही लागू शकतो, यामुळे वडिलांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला असता सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला व त्याचवेळी वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात भोसकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने जखमी सौरभला खासगी रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी रात्री ११ वाजता मयत घोषीत केले.

घटनेची वाच्यता झाली अन‌् वडिलांना घेतले ताब्यात

या घटनेची वाच्यता झाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, कावडे, दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, संजय शेलार, अभिजित सैदाणे, अमित बाविस्कर, राहूल घेटे, राहूल पाटील, विजय निकम व अनिल कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळ व जिल्हा रुग्णालयात जावून घटनाक्रम जाणून घेत सौरभचे वडील सुभाष वर्मा यांना ताब्यात घेतले. दरम्यान, शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.