शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

जळगाव शहरात मेहुण्याचा शालकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:19 PM

तंबाखू मागितल्याचा राग आल्याने गोपाळ अशोक पाटील या चुलत मेहूण्याने शालक राजेश रमेश मोरे (वय १८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ठळक मुद्दे हरिविठ्ठल नगरात घडली घटनाजखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२४ : तंबाखू मागितल्याचा राग आल्याने गोपाळ अशोक पाटील या चुलत मेहूण्याने शालक राजेश रमेश मोरे (वय १८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजेश मोरे शुक्रवारी रात्री दहा वाजतामावशीच्या घरासमोर थांबलेला असताना तेथे चुलत बहिणीचा पती गोपाळ अशोक पाटील (रा.खंडेराव नगर, जळगाव) हा आला असता त्याला राजेश याने तंबाखू मागितली. त्या कारणावरुन गोपाळ याने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दुचाकी अडकविण्याच्या किचनमध्ये असलेला लहान चाकू गळ्यावर मारला. यावेळी गोपाळची पत्नी आरती देखील तेथे होती. तिने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिलाही गोपाळ ने मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईकांनी राजेश याला रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील यांनी जखमीचा जिल्हा रुग्णालयात जावून जबाब नोंदविला.