शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

सामान्य जनता आणि मातीशी घट्ट नातं जपताहेत किशोर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:44 IST

कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे!

ठळक मुद्देभाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांचा विस्मयकारक प्रवासशेतकरी व जनतेसाठी स्वत:च्याच शासनाविरोधात अनेकदा आंदोलने

पाचोरा ( महेश कौंडिण्य)शांत, संयमी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी तितकंच आक्रमक होणारं व्यक्तिमत्व अर्थात आमदार किशोर पाटील! कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे!किशोर पाटील यांचे काका व माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी उद्योग क्षेत्रातून राजकारणात यशस्वी प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांची अफाट सभा पाचोरा शहराने अनुभवली तीसुद्धा आर. ओ .पाटील यांच्या प्रचारासाठी. आणि तिथूनच आर.ओ. पाटील यांच्या या यशासोबतच त्यांचा वसा जोपासणारा एक सक्षम युवक घडायला सुरुवात झाली होती.किशोर पाटील यांनी पोलिस कॉन्स्टेबलपदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला. २००१ मध्ये ते पाचोरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिली. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे किशोर आप्पा सामान्यातल्या सामान्य म्हणूनच वावरत असतात.एकीकडे आर. ओ. पाटील यांच्या कामातील व्यग्रता, शांतपणा,सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, त्यातील कमालीचे सातत्य, विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी ते पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा आणि दूरदृष्टी यासारख्या गुणांचा अनुभव किशोर पाटील यांच्या बोलणे आणि वागण्यातून येत असतो.जनतेशी थेट संपर्क ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू ठरली. जेव्हा आर.ओ.पाटील यांनी आमदार म्हणून निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं तेव्हा त्यांना किशोर अप्पांसारखं कुशल आणि यशस्वी नेतृत्व खुणावत होतं! सन २०१४ मध्ये किशोर आप्पा आमदार म्हणून निवडून आले.आर .ओ. पाटील यांच्याकडून मिळालेला वसा जोपासत त्यांनी सामान्य जनतेशी आणि मातीशी असलेलं आपलं नातं कधीच तोडलं नाही. त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार असोत की मग जिल्हा बँकेचे संचालक,उपाध्यक्ष किंवा जिल्हा दूध संघाचे संचालक असोत, आपल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी सामान्य जनतेचाच विचार बाळगला. शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी किशोर पाटील यांनी स्वत:च्याच शासनाविरोधात कधी रास्ता रोको केला तर कधी भडगाव येथील १३२ केव्ही सबस्टेशनसाठी शासनाविरोधात अधिवेशनाच्या काळात उपोषण सुरू केले. आर.ओ.पाटील यांच्याकडून घेतलेला वसा किशोर आप्पा यांनी समर्थपणे पेललेला आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण