यात दि. १२ रोजी हभप गणेश महाराज पहुरी ता. पाचोरा, दि. १३ रोजी हभप. भीमराव महाराज, चाळीसगाव, दि. १४ रोजी हभप रवींद्र महाराज वाडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. दि. १५ रोजी हभप भरत महाराज वाडे, दि. १६ रोजी हभप रवींद्र महाराज, तारखेडा, ता. पाचोरा, दि. १७ रोजी हभप मुकेश महाराज, आंबापिंप्री, ता. पारोळा, दि. १८ रोजी हभप ज्ञानेश्वर माऊली, सातगाव, ता. पाचोरा, दि. १९ रोजी हभप सुदेश महाराज जोशी, वलठाण यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
तसेच दि. १८ रोजी सकाळी ८ वाजता पालखी सोहळा निघणार आहे. तरी कीर्तनासह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक श्री हनुमंत आरती मंडळ वारकरी, सरस्वती वही भजन मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.