जळगाव : किरण पवार यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पर्यावरणशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. गौरी राणे यांचे मार्गदर्शन लाभले. एम्बिएन्ट एअर कॉलिटी स्टेटस ॲण्ड सिझनल व्हेरिएशन्स इन एरोमायकोफ्लोरा ऑफ भुसावळ सिटी या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता.
००००००००
वास्तुशास्त्र परीक्षेत धर्माधिकारी यांचे यश (२२ सीटीआर ०८)
जळगाव : ठाणे येथील वास्तुशास्त्र एज्युकेशन ॲण्ड रिसर्च फाउंडेशनतर्फे जून महिन्यात घेण्यात आलेल्या वास्तुशास्त्र परीक्षेत शहरातील राजेंद्र मिठाराम धर्माधिकारी हे ‘अ’ श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना वास्तुतज्ज्ञ धनंजय अमृतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
००००००००
आरपीआयच्या विभागप्रमुखपदी कुकरेजा (२२ सीटीआर ०६)
जळगाव : आरपीआय (खरात गट) च्या सिंधी कॉलनी परिसर विभाग प्रमुखपदी वासू कुकरेजा यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष जे.डी. भालेराव यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देऊन केली आहे. निवडीबद्दल महानगर अध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे, दीपक बि-हाडे, प्रकाश सोनवणे, बापू बि-हाडे अण्णा अडकमोल आदींनी अभिनंदन केले आहे.
०००००००
शनिवारी डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय अध्यासन विभागाच्यावतीने पंडित दीनदयाल जयंतीनिमित्त शनिवारी दुपारी १२ वाजता अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. श्यामकांत भादलीकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यासनाचे संचालक प्रा. विवेक काटदरे यांनी दिली.