शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रसिक थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:07 IST

‘दिव्य तेज’ कार्यक्रमास प्रतिसाद

ठळक मुद्देसन्मान फाउंडेशन, रोटरी मीडटाऊन, दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे आयोजनचित्रफितीने भारावले रसिक

जळगाव : शिर्डीवाले साईबाबा, चिठ्ठी ना कोई संदेश, आकाशी झेप घे रे पाखरा, माणसाने माणसाशी मानसासम वागणे अशा एकाहून एक सरस गीतांचे दिव्यांग विद्यार्थ्यांनी ‘दिव्य तेज’ या कार्यक्रमात केलेल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकून दाद मिळविली.सन्मान फाउंडेशन, रोटरी मीडटाऊन, दीपस्तंभ फाउंडेशन यांच्यातर्फे डॉ. स्वरुप लोढा यांच्या स्मरणार्थ शनिवारी संध्याकाळी कांताई सभागृहात ‘दिव्य तेज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल केंद्राच्या विद्यार्थ्यांनी गीते सादर केली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजीव शर्मा, रोटरी क्लब आॅफ जळगाव मीडटाऊनचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्ताविक दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद महाजन यांनी केले. त्यानंतर डॉ. सन्मान फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुमन लोढा, रोटरी मीडटाऊनचे माजी अध्यक्ष अनंत खांबेटे यांनी उपक्रमाविषयी माहिती देत मदतीचे आवाहन केले.चित्रफितीने भारावले रसिकमुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोबल केंद्राच्या दैनंदिन जीवनाची चित्रफित दाखविण्यात आली. यात ते कोणतेही काम कशाप्रकारे पूर्ण करतात व सर्व बाबतीत आघाडीवर राहत असल्याचे पाहून उपस्थित रसिक भारावून गेले. मनोबल केंद्राचा तेजस नाईक हा उत्कृष्ट गायक होता. त्याच्या निधनानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या विचारात साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तेजसच्या गीतांची चित्रफित दाखविण्यात आली. त्याने सादर केलेल्या गीतांना उपस्थितांनी दाद दिली.त्यानंतर गुरुप्रसाद सावंत व आशा वारंमळे यांनी सादर केलेल्या शिर्डी वाले साई बाबा... या जोशपूर्ण गीताने बहारदार सुरुवात झाली. त्यानंतर समीर खोब्रागडे, हिरादास बैरागी, विश्वास इलामे, हरिष चकोबे, जितेंद्र राठोड, लक्ष्मी शिंदे, दुर्गा गवई, दिव्यना अधिकारी, बाबी वानरे, वैष्णवी गोळे, कविता हडप यांनी समूह गीतांसह तु इस तराह से मेरी जिंदगी मे, कर चले हम फिदा, भातुकलीच्या खेळामधली अशी मराठी ंिहंदी गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

टॅग्स :musicसंगीतJalgaonजळगाव