शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाला, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 23:30 IST

मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ही घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

ठळक मुद्देवरगव्हाणची घटना : भिंत कोसळल्याने सहा महिला जखमी, दुर्दैवी घटनेने शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क

बिबिडगाव, ता. चोपडा : मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ओट्यावर बसलेल्या असताना भिंत कोसळून एक आदिवासी महिला ठार तर सहा महिला जखमी झाल्याची घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

पुरूष मंडळी प्रेत घेऊन स्मशानभूमीत गेले होते. समाज प्रथेप्रमाणे सर्व महिला गावहाळ जवळ हातपाय धुण्यासाठी गेल्या असताना शेजारीच असलेल्या एका बांधकामाच्या ओट्यावर काही महिला बसल्या. क्रूर काळाने या गरीब आदिवासी महिलांवर आपला डाव साधत ओट्यासह भिंत कोसळली. व एक महिला जागीच ठार झाली तर तब्बल सहा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी वरगव्हान येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे रामा रतन पावरा यांची  सून उषाबाई विजय पावरा यांचे निधन झाले होते. त्यामुळे नातेवाईक व आप्तेष्ट अंत्यसंस्कारासाठी जमलेले होते. मयत महिलेचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पुरूष मंडळी घेऊन गेले होते. इकडे सर्व महिला समाज प्रथेप्रमाणे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गावहाळवर गेल्या व काही महीला शेजारीच बांधकाम सुरु असलेल्या भिकन दमड्या पावरा यांच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक ओट्यासह घराची भिंत पडली व क्षणात होत्याचे नव्हते झाले. यात गावातीलच जेलीबाई परशुराम बारेला ही अपंग महिला जागीच ठार झाली तर त्यांच्यासोबत लालबाई मारसिंग पावरा, कुसुमबाई नरसिंग पावरा, कालुबाई प्रताप बारेला, बाकलीबाई भाईदास पावरा, जसुबाई शेवा पावरा, सायकाबाई भायला पावरा या गंभीर जखमी झाल्या.

घटना घडली तेव्हा सर्व पुरुष अंत्ययात्रेत गेले होते. यावेळी गावाचे सरपंच भूषण पाटील यांनी स्वतःच्या गाडीत जखमींना टाकत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी उपचार करत जखमींना अधिक उपचारासाठी जळगावी रवाना केले.

याठिकाणी पं. स.चे उपसभापती सुर्यकांत खैरनार यांनी भेट दिली तर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तलाठी सरोवर तडवी यांनी भेट दिली तर अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनीही आपले सहकारी पाठवत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले.

पती - पत्नीचा आधीच अपंगत्वाशी संघर्ष

पती आणि पत्नीचा अपंगत्वाशी संघर्ष करतच संसार सुरु होता. त्यांना तिन्ही मुलीच.. आणि आता क्रुर काळाने पत्नीलाही हिरावले. असा दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग हा या घटनेतील मयत जेलीबाईचे पती परशुराम नागराज पावरा यांच्यावर आलाय. पत्नी अपंग असुनही काम करायच्या, स्वतः ही अपंग असतांना गुो चारून आपल्या संसाराचा शगाडा चालवून तिन्ही मुलींचे शिक्षण करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यातही आता क्रुर काळाने घात करुन पत्नीलाही कायमचं हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत असून किमान शासनाने तरी या दुर्दैवी परशुराम यांच्या या संकटात आर्थिक फुंकरचा मलम लावावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाDeathमृत्यू