शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

खाविआ-मनसे मैत्रीचे नवे पर्व

By admin | Updated: October 14, 2015 00:06 IST

खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भाजपा व राष्ट्रवादीपासून दूर जात मनसेने खाविआ सोबत घरोबा केला आहे.

जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला महापालिकेत खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भाजपा व राष्ट्रवादीपासून दूर जात मनसेने खाविआ सोबत घरोबा केला आहे. भाजपाची केंद्र व राज्यात सत्ता असतानाही त्यांनी शहरवासीयांचा भ्रमनिरास केल्याने शहराच्या विकासासाठी खाविआ सोबत युती करीत असल्याची घोषणा मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी मंगळवारी केली. या युतीमुळे स्थायी समिती सभापतीपद खाविआकडे तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद मनसेकडे राहिल.

स्थायी समिती सभापती पदासाठी ‘खाविआ’तर्फे नितीन बरडे तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी ‘मनसे’च्या खुशबू बनसोडे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. गुरुवार, 14 रोजी सभापतीपदाची निवड होणार आहे. ‘खाविआ’कडे राहिल, असे आम्ही प्रस्तावात म्हटले होते. आठ दिवसांपासून आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा सुरू होती. मात्र, महापौरपद हे भाजपाकडेच राहील; यावर ते ठाम होते. त्यामुळे खाविआ व भाजप यांच्यातील चर्चा फिस्कटली. ‘खाविआ’कडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे महापालिकेत अस्थिर राजकारण होत होते. मात्र, आता ‘मनसे’ ने खाविआसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता खाविआचे 35 व मनसेचे 12 असे एकूण 47 सदस्य संख्या झाली आहे. त्यामुळे आता खाविआचे स्पष्ट बहुमत झाले असून मनपातील अस्थिर राजकारण संपणार असल्याची आशा उपमहापौर सुनील महाजन यांनी व्यक्त केली आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे

दिवसभरात दोनच अर्ज

मंगळवारी दिवसभरात नितीन बरडे व खुशबू बनसाडे यांचा अर्ज दाखल झाला. दरम्यान, बरडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून नितीन लढ्ढा तर अनुमोदक म्हणून श्यामकांत सोनवणे यांनी स्वाक्षरी आहे. बनसोडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून मंगला चौधरी व अनुमोदक म्हणून शीतल चौधरी यांनी सही आहे.

बरडे व बनसोडे यांची निवड निश्चित

खाविआ व मनसे एकत्र आल्यामुळे आता मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी नितीन बरडे व महिला व बाल कल्याण समितीपदासाठी खुशबू बनसाडे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

पक्षीय बलाबल

स्थायी समितीत

महापौरपदही खाविआकडेच राहणार

खाविआ व मनसेचा व्हीप’ जारी‘व्हीप’ (पक्षादेश) जारी करण्यात आला. सदस्यांनी विरोधात मतदान करू नये, यासाठी हा पक्षादेश जारी करण्यात आला आहे. ‘खाविआ’चे 8 तर मनसेचा एक असे एकूण नऊ सदस्य आहेत. भाजपचे चार व राष्ट्रवादी पक्षाचे 2 असे एकूण 6 हे विरोधी पक्षाचे बलाबल आहेत. महिला व बाल कल्याण समितीतही खाविआ व मनसे मिळून 6 तर राष्ट्रवादी व भाजप मिळून 3 अशी सदस्य संख्या आहे. अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी दुपारी 12 र्पयत मुदत आहे.

खाविआ’तर्फे महापौरपदी नितीन लढ्ढा यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती विद्यमान उपमहापौर सुनील महाजन यांनी दिली . त्यामुळे खाविआ व मनसे यांच्यात झालेल्या युतीनुसार उपमहापौर पद हे मनसेकडे जाण्याची शक्यता आहे.

''

- सुरेश भोळे, आमदार

मनसेने ‘खाविआ’ सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘मनसे’ ने आता गेल्या घरी सुखी रहावे, यासाठी माङया शुभेच्छा आहेत. आम्हाला विकास करायचा आहे. राजकारण करायचे नाही. महापालिकेत आमचे बहुमत नाही. त्यामुळे स्थायी समिती सभापती व महिला व बालक कल्याण समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याबाबत बुधवारी सकाळी कार्यकत्र्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

''

- ललित कोल्हे, गटनेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

- नितीन लढ्ढा, नगरसेवक, खाविआ

राष्ट्रवादी व भाजपच्या सोबत आम्ही होतो. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, गेल्या दीड वर्षात या आशेवर पाणी फिरले. त्यामुळे आम्ही खाविआसोबत युती केली आहे. महापालिकेत आता स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येणा:या काळात शहराचा विकास घडवून आणणार, हे निश्चित!'' शहराच्या विकासासाठी मनसेसोबत आम्ही युती केली आहे. तत्पूर्वी भाजपालाही आम्ही स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी तो अमान्य केला. त्यामुळे आम्ही मनसेशी युती केली.

भाजपाचा महापौरपदाचा हट्ट कायम राहिल्याने चर्चा फिस्कटली

नगरविकास विभागाचे सचिव निरंजन सैंदाणे यांच्याकडे सभापतीपदाचे अर्ज दाखल झाल्यानंतर उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की खाविआतर्फे भाजपला स्थायी समिती सभापती पदासाठी प्रस्ताव दिला होता. याबदल्यात महापौर व उपमहापौरपद हे

सत्तेत असलेल्या