शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:48 IST

कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो.

चंद्रशेखर जोशीकुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो. काही भागात वरण, पोळी वांग्याची भाजी असते, काही भागात बट्टी व घोटलेल्या वांग्याची भाजी असते विभागनिहाय खाद्य संस्कृती ही बदलते. मात्र बहुतांश भागात एक भाजी ठरलेली ती म्हणजे वांग्याची भाजी. खान्देशी वांगे हे राज्यात प्रसिद्ध आहेत. जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती पुण्या-मुंबईकडे जायला निघाली की ज्यांच्याकडे जाणार त्या व्यक्तीचा एक निरोप हमखास असतो तो म्हणजे येतांना भरताची वांगी घेऊन आणि हिवाळा असला की मेहरूणची बोरेही ठरलेली. खान्देशी भरताची गोडी काही औरच असल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यामुळेच विविध संस्थांतर्फे आयोजित केली जाणारे संमेलने होतात त्यावेळी भरीत हा मेनू ठरलेला असतो. अगदी देशभरातून आलेल्या व्यक्ती भरतावर ताव मारतात. बोटे चोखीत या खाद्याची स्तुुती करतात. भरताचे हे खाद्य आता केवळ जळगाव जिल्ह्यापर्यंत मर्यादीत राहीले नाही तर त्याच्या चवेची चर्चा ही जगभरात पोहोचणार आहे. याला निमित्त ठरले ते शहरातील मराठी प्रतिष्ठान. खान्देशी वाग्यांचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगावातील सागर पार्क मैदानावर २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सतत सहा तास परिश्रम करून तीन हजार किलो भरीत बनविण्याचा विक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. ‘लार्जेस्ट मेकींग आॅफ एगप्लांट’ या नावाने या रेकॉर्डची नोंद दोन्ही संस्थांमध्ये होणार आहे. यासाठी मराठी प्रतिष्ठानचे प्रमुख विजय वाणी, अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी गेल्या काही काळात अविरत परिश्रम घेतले. या निमित्ताने जळगावच्या भरीताची चर्चा आता जागतिक पातळीवर झाली आहे. खान्देशातील खाद्य संस्कृतीच्या शिरोपेचात एक मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जळगावकरांच्या सहकार्याने हा उपक्रम अतिशय यशस्वी करून दाखविला. हजारो जळगावकर या क्षणाचे साक्षीदार झाले व बहुतांश नागरिकांनी भरताची चव चाखत. तयार करण्याच्या पारंपरीक पद्धतीला दाद दिली.

 

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न