खान्देशातील गुणवंतांचा मांडळ येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2021 04:20 PM2021-11-05T16:20:45+5:302021-11-05T16:21:59+5:30

यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्यांचा सन्मान करण्यात आला.

Khandesh's dignitaries felicitated at Mandal | खान्देशातील गुणवंतांचा मांडळ येथे सत्कार

खान्देशातील गुणवंतांचा मांडळ येथे सत्कार

Next



संजय पाटील
अमळनेर : यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेले   अधिकारी यांचा मांडळ ग्रामस्थांकडून कर्तृत्वाचा गौरव सोहळा मांडळ येथे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी यूपीएससी परीक्षेत १८२ रँक मिळवणारे गौरव साळुंके, ४८४ रँक मिळवणाऱ्या दृष्टी जैन व एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार आमदार अनिल पाटील व शिंदखेडा येथील माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच गौरव साळुंके यांचा सत्कार सरपंच  विद्या पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
मानसी पाटील यांचा सत्कार माजी सरपंच रंजना जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झाला.
ओडिशा राज्यात संबलपूरचे जिल्हाधिकारी मयूर सुर्यवंशी हेदेखील डॉ.दीपक पाटील यांचे भाचे असल्याने त्यांच्या आईवडिलांचादेखील सत्कार करण्यात आला. तसेच गावातील सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्याचा सत्कार  करण्यात आला.

प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मानसी पाटील म्हणाल्या की, मला शिक्षणाची प्रेरणा मांडळ येथील डॉ. सुनील चोरडिया यांच्यामुळेच मिळाली. मांडळ हे गाव कायम लोकांना सहकार्य करणारे गाव आहे. आमचे यश जरी छोटे असले तरी आमचे घाव मात्र कोणाला दिसत नाहीत.
गौरव साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, माझं आणि मांडळचे नाते खुप जवळचे आहे. मांडळ हे गाव माझ्या मामाचे गाव आहे. मला वाचनाचे संस्कार माझ्या आईकडून मिळाले. यश हे सहज शक्य होत नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. आयएएस होणे हे खूप मोठं नाही परंतु समाजासाठी काही करायचे आहे यासाठी या परीक्षेत यावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मी पण स्पर्धा परीक्षा दिली होती. माझेही स्वप्न लाल दिव्याच्या गाडीचे आहे, असे सांगून गौरव साळुंके यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शामराव पाटील, डॉ. वाय. आर. सुर्यवंशी, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, जि. प. सदस्य संगीता भिल, लोण येथील माजी सरपंच अंकिता पाटील, माजी सरपंच नारायण कोळी, माजी सरपंच डॉ. अशोक पाटील, माजी सरपंच विनायक बडगुजर, रामदास जीवन कोळी, बाळासाहेब पवार, वसंत पाटील, नाना धनगर, जितेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, वि. का. सोसायटी चेअरमन, मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन किरण बडगुजर  व गंगासागर वानखेडे  यांनी केले.

Web Title: Khandesh's dignitaries felicitated at Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.