शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

खान्देशातील जिनिंग उद्योगाला ५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:18 IST

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये खान्देशातील तिघा जिल्ह्यात दिडशेवर असलेल्या जिनिंंग उद्योग बंद असल्याने कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देजिनिंग बंद पण सीसी व कर्जाचे व्याज सुरूचकर्मचाऱ्यांचा पगार देणे आवश्यकखान्देशात दीड लाख गठाण पडून, भाव घटलेखान्देशातील आठ हजार मजूर गेले गावी

शरदकुमार बन्सीधरणगाव, जि.जळगाव : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये खान्देशातील तिघा जिल्ह्यात दिडशेवर असलेल्या जिनिंंग उद्योग बंद असल्याने कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे. या लॉकडाऊन काळात जिनिंंग उद्योग बंद असला तरी सीसीवरील व्याज, कर्जावरील व्याज, कर्मचाऱ्यांंचे पगार तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गठाणच्या भावात झालेली घसरण यामुळे खान्देशातील जिनिंग उद्योगाला ५० कोटीचा फटका बसला आहे. कोरोनाने या सिजनमध्ये मोठा फटका दिल्याने उद्योजक चिंताग्रस्त झाले आहे.कापूस उत्पादन वाढले, पण कोरोनामुळे घातया वर्षी खान्देशात कापूस उत्पादन चांगले होते. त्यामुळे जिनींग उद्योगाची भरभराट होती. खान्देशातून दरवर्षी १८ ते २० लाखावर गाठ तयार होतात. या वर्षी २२ लाख गठाण तयार तयार होईल असा अंदाज होता. मात्र कोरोना लॉकडाऊन मुळे एक महिन्याची आवक कमी होऊन कमी माल खरेदी होणार असल्याने १५/१६ लाख गाठी तयार होतील, असा अंंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.भाव घटल्याने फटका, दीड लाख गाठी पडूनकोरोना महामारीमुळे कापसाच्या गाठींचे भाव घटले आहेत, ज्या देशात गाठींची निर्यात होते त्या चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हियतनाममध्ये कोरोनाने थैमान घातल्याने यावर्षी कापसाच्या गाठीचे भाव वाढण्याची शक्यता कमीच आहे. आजच्या घडीला खान्देशातील जिनिंंगांमध्ये अदमासे दीड लाख गाठी पडून असल्याचे उद्योजकांचा अंदाज आहे. भाव कमी झाल्याचा प्रत्येक जिनर्सला याचा फटका बसला आहे.जिनिंंग उद्योग बंद तरी खर्च सुरुचलॉकडाऊनमुळे जिनिंंग उद्योग बंद असले तरी नियमित कर्मचारी पगार, वीज बील, कर्जावरील व्याज, सीसीवरील व्याज आदी खर्च सुरुच असल्याने जिनिंंग उद्योजक चिंताग्रस्त आहेत.आठ हजार कामगार गावाकडेखान्देशातील जिनिंंग उद्योगात अदमासे आठ हजार आदिवासी, पावरा व इतर मजूर काम करीत असून लॉकडाऊनमुळे हे मजूर आपापल्या गावाकडे निघून गेले असल्याने लॉकडाऊन उघडल्यावर हे मजूर केव्हा परत जिनिंगमध्ये कामाला येतील, याचीही चिंता उद्योजकांना इ.कारण मजूर आल्याशिवाय जिनींग मध्ये काम आवरणे अशक्यच असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाऊन हे आपण सर्वांचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे इतर उद्योगाप्रमाणे जिनींग उद्योगाला फटका बसला आहे. खान्देशात कोट्यवधीचा व्यवहार ठप्प झाला आहे. तसेच वीज बील, इतर कर्मचारी पगार, कर्जाचे, सीसीचे व्याज तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गठाणच्या भावात झालेल्या घसरणीमुळे खान्देशातील जिनिंंग उद्योगाला सुमारे ५० कोटींचा फटका बसला आहे. शेतीपूरक असलेल्या या उद्योगाचे लॉकडाऊन काळातील वीज बील, कर्जाचे व सीसीचे बँकेचे व्याज माफ केल्यास उद्योजकांना हातभार लागेल.-जीवनसिंह बयस, जिनिंग चालक, धरणगाव

टॅग्स :cottonकापूसDharangaonधरणगाव