दहा जागांवर विजय : काँग्रेसने पाच ठिकाणी बाजी मारली
जळगाव : आज खान्देशातील २0 विधानसभा मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागले. २0 पैकी एकट्या भाजपने निम्म्या म्हणजे १0 जागांवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली आहे. त्याखालोखाल काँग्रेसने पाच जागा मिळविल्या आहेत.
धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी ४६ हजारांचे सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे. तर दुसरीकडे शहादा मतदारसंघात भाजपचे उदेसिंग पाडवी यांचा निसटता म्हणजे ७१९ मतांनी विजय झाला.
जळगाव जिल्ह्यात मावळत्या आठ आमदारांचा धक्कादायक पराभव झाला. धुळे ग्रामीणला काँग्रेसचे कुणाल पाटील, साक्रीला डी. एस. अहिरे, शिरपूरला काशिराम पावरा, तर धुळे शहरात अनिल गोटे, शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावल विजयी झाले.
--------
जिल्ह्यात भाजपाला सहा, शिवसेनेला तीन, तर राष्ट्रवादीला एकमेव जागा राखता आली. अमळनेरची जागा मात्र अपक्षाने पटकावली. शहाद्यातून मावळते पालकमंत्री अँड.पद्माकर वळवी, तर नवापुरातून मावळते आमदार शरद गावीत या दोघांचा मात्र पराभव झाला आहे. नंदुरबारमधून डॉ.विजयकुमार गावीत व अक्कलकुव्यातून अँड.के.सी. पाडवी हे विजयी झाले. नवापूरमधून सुरूपसिंग नाईक या वेळी मात्र विजयी झाले तर शहाद्यातून अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपाचे उदेसिंग पाडवी हे विजयी झाले.