खानापूर महसूल भाग मंडळातील खानापूर, निरूळ, पाडळे बु., पाडळे खुर्द अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, केऱ्हाळे बु., केऱ्हाळे खुर्द, मंगरूळ, जुनोने, भोकरी, कर्जोद, वाघोड, मोरगाव बु., मोरगाव खुर्द, बोरखेडा, तामसवाडी, अटवाडे, अजनाड, चोरवड, दोधे, नेहता गावातील शेतकऱ्यांनी संगणकीकृत ७/१२ उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी खानापूर महसूल मंडळाधिकारी यांच्या कार्यालयात २६ जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या संगणकीकृत ७/१२ उतारा दुरुस्ती शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर महसूल भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी केले आहे.
संगणकीकृत ७ /१२ उताऱ्यातील १५५ अंतर्गत दुरुस्ती करणे, संगणकीकृत व हस्तलिखित ७/१२ वाचन करून दुरुस्त करणे, फेरफार नोंदीसाठी अर्ज स्वीकारणे, फेरफार प्रमाणीकरणाचे निर्गमन करणे, संगणकीकृत अहवाल सादर करणे अशा दुरुस्तीचा समावेश आहे.
या संगणकीकृत सात-बारा उतारा चुका दुरुस्ती शिबिरात सहभागी होताना मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करणे अनिवार्य ठरणार आहे. तलाठी वा मंडळाधिकारी यांच्या अधिकारात नसलेल्या चुकांच्या दुरुस्तीचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.