शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा येथे म्हशींना घटसर्पाची लागण, सात दिवसात सात म्हशी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 14:23 IST

खामखेडा गावात म्हशींना घटसर्पाची लागण लागली आहे.

मतीन शेखमुक्ताईनगर : दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या  तालुक्यातील खामखेडा गावात म्हशींना घटसर्पाची लागण लागली असून, आठवड्या भरात ७ म्हशी दगावलेल्या आहेत. यामुळे पशुधन मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.येथे गेल्या आठवडाभरापूर्वी एका म्हशीचे अचानक डोळे लाल पडले आणि दुसऱ्याच दिवशी म्हैस दगावली. अशाच प्रकारे तिसऱ्या व चौथ्या दिवशी दररोज एक म्हैस दगावण्याचे सत्र सलग सात दिवसांपासून सुरू आहे. सात म्हशी दगावल्यायात कैलास सुकदेव पाटील यांच्या दोन, प्रवीण प्रकाश गवते यांच्या दोन, सुनील शालिक गावळे  व रामचंद्र त्र्यंबक गवते  यांची प्रत्येकी एक, तर अन्य एक अशा सात म्हशी दगावल्या. दररोज एक म्हैस दगावत असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी भयभीत झाले आहेत.अचानक म्हशी दगावल्याने गावातील इतर म्हशी पशुधन मालकांमध्ये  भीती निर्माण झाली आहे. तब्बल६० ते ९० हजारांच्या किमतीच्या या म्हशी डोळ्यादेखत जात असल्याने आर्थिक नुकसानीपाठोपाठ जीव लावलेले पशुधन गमविण्याचे दुःख तर इतरांना आपल्या म्हशींची काळजी अशी स्थिती येथे निर्माण झाली.गावात ४९५ म्हशीघरात बायको नसली तर चालेल, मात्र दाराशी म्हशी पाहिजेच, असा प्रघात असलेल्या खामखेडा गावात म्हशींवर साथीच्या आजाराचे सावट पसरले आहे. अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात ४९५ म्हशी आहेत. म्हशींवर आलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पशुधन मालक भीतीच्या सावटात आहे.घटसर्पाचा प्राथमिक निष्कर्षसोमवारी दगावलेल्या एका म्हशीचे माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.वाय.नारखेडे यांनी शवविच्छेदन केले. यात म्हशींचे मृत्यू घटसर्प आजारामुळे अंतर्गत रक्तस्त्रावामुळे होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी दिला व तातळीन म्हशींना घटसर्पाच्या लसीकरण करण्याचे सुचविले.

खामखेडा येथे म्हशींचा मृत्यू हा घटसर्प आजारामुळे होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. येथे म्हशींना लसीकरण करण्याची उपाययोजना आरंभली आहे. -डॉ अभय डुघरेकर,  पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर