शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

खडसेंचा ‘शब्दभेदी बाण’ कुणाला घायाळ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 23:08 IST

राजरंग जळगावचे...

- विलास बारीजिल्ह्यातील राजकारण आता नव्या वळणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अभ्यासू आणि प्रशासनातील चांगली जाण असणाऱ्या माजी मंत्री खडसे यांनी विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधारी आणि विरोधकांना आपल्या शब्दभेदी बाणांनी घायाळ केले आहे. मात्र हेच बाण आता स्वकियांविरूद्ध वापरले जात असल्याने खडसे यांचे हे बाण आणखी कुणाला घायाळ करतील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्यपाल, राज्यसभा आणि विधान परिषद या सर्व आश्वासनांची पूर्ती न झाल्याने स्वत: खडसेदेखील सध्या निर्णायक मुडमध्ये दिसत आहेत. या साºयात नेहमीप्रमाणे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे-फडणवीस प्रकरणावर भाष्य टाळले आहे.व्हिडीओ क्लिप आणि जळगाव...राजकारणात मनी, पॉवर आणि मसल हे तीन फॅक्टर महत्त्वाचे आणि यशाचे मार्ग ठरतात. यासाºयाला आता ‘हनी ट्रप’सह वेगवेगळ्या माध्यमातून संपविण्याचे प्रकार सुरु झाले आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका तत्कालिन खासदाराचे तिकिट कापण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा वापर झाला. या निवडणुकीत दोघांचा वाद आणि तिसºयाचा लाभ असा परिणाम दिसून आला. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या माजी मंत्र्याच्या पीएची एका महिलेसोबतची अश्लिल क्लिप वरिष्ठांकडे सोपविल्याचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी केला आहे. याबाबत त्यांनी जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांना विचारण्यास सांगितले असताना लोढा यांनीदेखील आपल्याकडे अनेक कारनामे असल्याचे सांगत दुजोरा दिला आहे. सध्या ते माजी मंत्री त्यांचे स्वीय सहाय्यक कोण? हा प्रश्न अनुत्तरिय असला तरी पुन्हा एकदा व्हिडिओ क्लिप पुराण पुढे आले आहे. हे व्हिडिओ क्लिप पुराण जिल्ह्याच्या राजकारणात कोणते वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीप्रमाणे यासाºया प्रकारावर भाष्य करणे टाळले आहे.खडसे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांनादेखील वरिष्ठ नेतेच उत्तर देतील असे सांगत त्यांनी पुन्हा मुरब्बीपणा दाखविला आहे.सेनेतही वर्चस्वाचे बाणभाजपमधील अंतर्गत गटबाजी सुरु असताना शिवसेनेला जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी चांगला वाव आहे. त्यादृष्टीने सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयत्नदेखील सुरु केले आहेत.ज्या भागात सेनेचे वर्चस्व नाही त्या भागाची जबाबदारी त्यांनी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती. तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात भाजपची आंदोलने आता आक्रमक पद्धतीने होत आहे.चाळीसगावे भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात आंदोलन करून शिवसेनेने जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मात्र सध्या सेनेमध्ये वर्चस्वाचे अंतर्गत शब्दभेदी बाण सुरु आहेत. एरंडोल येथील कोविड सेंटरमधील सुविधांच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यात कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींच्या मैदानात उतरण्यावरून रणकंदन सुरु झाले.आमदार चिमणराव पाटील यांच्याकडून पलटवार झाला. याठिकाणी पालकमंत्र्यांनी मुरब्बीपणा दाखवित विषय न वाढविता त्यावर पडदा टाकला. त्यामुळे सध्यातरी हा वाद शांत झाला आहे.