शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचे सूचक उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 20:03 IST

पक्षाची भूमिका याबाबत सतत चर्चा

चंद्रशेखर जोशीजळगाव : भाजपातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याबाबतीत पक्षाची भूमिका याबाबत सतत चर्चा सुरू असतात. विशेष म्हणजे शांत बसण्याची किंवा ऐकून घेण्याची मानसिकता नसल्याने खडसे हे स्वत: नेहमी काही ना काही स्टेटमेंट करत असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणाले होते कोणताही नेता एका पार्टीत कायम स्वरूपी रहात नाही. ती पार्टी त्या नेत्यासाठी कायम कधीच नसते. त्यामुळे पुन्हा एकदा तर्क वितर्क लढविणे सुरू झाले आहे.पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जमिन खरेदी प्रकरणारून खडसे अडचणीत आले. त्या पाठोपाठ त्यांच्यावर एका पाठोपाठ एक आरोप सुरू झाले. त्यात दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संभाषणापासून तर अन्य काही आरोप त्यांच्यावर झाले. राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपात मुख्यमंत्र्यांनंतरचे दोन नंबरचे मंत्री कोण तर एकनाथराव खडसे असेच त्यावेळी सांगितले जात होते. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र पक्षांतर्गत वादातून त्यांना घेरले गेले व नंतर त्यांचा राजीनाम्यापासून मागे लागलेले विषय सर्वश्रृत आहेत. राजीनामा देण्यापूर्वी व नंतर खडसेंनी विविध ठिकाणी केलेले स्टेटमेंट फारच गाजले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व त्यांच्यातील वाद कोर्टात पोहोचले. अजूनही दोघांना कोर्टाच्या खेट्या घालाव्या लागत आहेत. दमानिया खडसेंवर आरोप करत असतात खडसे त्याला उत्तर देत असतात. त्यातच गेल्या वर्ष दोन वर्षात खडसे यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोध वाढतो आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी खडसेंबाबत निर्वाळा दिला. ते निर्दोष असल्याचे वैयक्तीक प्रमाणपत्र दिले गेले मात्र नंतरची कोणतीही कृती पक्ष पातळीवर झाली नाही. एवढेच नव्हे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील वादाने आता रौद्ररूप धारण केले आहे. त्यावरही पक्षात कोणीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे खडसेंचे उद्गार चर्चेचा विषय ठरले आहे. कोणताही नेता एका पार्टीत कायम रहात नाही...याचा अर्थ लावला गेला तो म्हणजे ते पक्ष सोडणार असाच लावला जात आहे. आगामी काळात लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाला खडसेंबाबत निश्चित असा विचार करावाच लागणार आहे. मात्र पक्षाची नेमकी काय भूमिका असेल हे येता काळच ठरवेल...

टॅग्स :Jalgaonजळगाव